Yoon Suk Yeol : दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष यून सुक येओल यांना 30 वर्षांची शिक्षा
दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष यून सुक येओल (Yoon Suk Yeol) यांना उत्तर कोरियामध्ये ड्रोन पाठवल्याबद्दल न्यायालयाने 30 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

Yoon Suk Yeol : दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष यून सुक येओल (Yoon Suk Yeol) यांना उत्तर कोरियामध्ये ड्रोन पाठवल्याबद्दल न्यायालयाने 30 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. उत्तर कोरियाला चिथावणी देण्यासाठी सुक येओल यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये या कारवाईचा आदेश दिला होता, असा आरोप आहे.
त्याच वर्षी नंतर यून (Yoon Suk Yeol) यांनी दक्षिण कोरियात मार्शल लॉ लागू करण्याचा प्रयत्न केला होता. पण हा मार्शल लॉ टिकवून ठेवण्यात त्यांना यश आले नव्हते. हा मार्शल लॉ लागू करण्याचे निमित्त निर्माण करण्याकरिता यून यांनी या कारवाईचे आदेश दिले होते. असे सरकारी पक्षाचे म्हणणे आहे. शत्रूला फायदा पोहोचवणे आणि सत्तेचा गैरवापर करणे या आरोपांखाली न्यायालयाने तुरुंगात असलेल्या यून सुक येओल (Yoon Suk Yeol) यांना दोषी ठरवले.
माजी संरक्षण मंत्री किम योंग-ह्यून यांनाही या कारवाईतील त्यांच्या भूमिकेसाठी 30 वर्षांची शिक्षा झाली. माजी संरक्षण प्रतिगुप्तचर कमांडचे प्रमुख येओ इन-ह्युंग यांनाही १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली, तर माजी ड्रोन ऑपरेशन्स कमांडचे प्रमुख किम योंग-दे यांना पाच वर्षांसाठी स्थगित केलेली तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली गेली.






