Vaibhav Suryavanshi : ‘५० षटकेही खेळू शकत नाही, तो ५ दिवस कसा खेळेल’, वैभवबद्दल माजी खेळाडूने उपस्थित केला सवाल

योगराज सिंग वैभवबद्दल काय म्हणाले?
इनसाइड स्पोर्टशी बोलताना योगराज सिंह यांनी अलीकडेच वैभव सूर्यवंशीबाबत केलेल्या वक्तव्याने चर्चा निर्माण केली आहे. त्यांनी वैभव सूर्यवंशीबद्दल म्हटले आहे की, “तो पाच दिवस फलंदाजी करू शकेल का?” योगराज सिंह यांचे मत आहे की खऱ्या खेळाडूची खरी कसोटी टेस्ट क्रिकेटमध्येच लागते. त्यांच्या मते, खेळाडूने तंदुरुस्त असणे गरजेचे आहे, जेणेकरून तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये खेळू शकेल. पाच दिवस खेळण्याची क्षमता वैभवमध्ये आहे का?
खरे क्रिकेट म्हणजे कसोटी क्रिकेट –
Test cricket debate 🏏#YograjSingh #VaibhavSuryavanshi #CricketBuzz #TestCricket #FitnessTalk #ViralSportsNews pic.twitter.com/Mi8slTIizj
— Laughing Colours (@LaughingColours) June 13, 2025
योगराज सिंग म्हणाले, “माझ्यासाठी खरे क्रिकेट म्हणजे कसोटी क्रिकेट. पाच दिवस खेळण्याची ताकद तुमच्यात आहे का? हाच खरा कस आहे. ५० षटकांचा खेळ ठीक आहे, २० षटकांचाही ठीक आहे. मी या फॉरमॅटवर जास्त लक्ष देत नाही. पण जेव्हा हे फॉरमॅट अस्तित्वात आहेत, तेव्हा तुम्ही इतके तंदुरुस्त असलेच पाहिजे की तिन्ही फॉरमॅट खेळू शकाल. मग तुम्ही का अडखळता? कारण तुमचं लक्ष फक्त टी-२०, आयपीएल आणि ५० षटकांवर आहे. आजकाल तर ५० षटकांचाही खेळ खेळता येत नाही.”
हेही वाचा – WTC 2025 Final : ऑस्ट्रेलियाची वाढली चिता! WTC फायलनमध्ये स्टार खेळाडूला झाली दुखापत, पाहा VIDEO
क्रिकेट प्रशासक आणि प्रशिक्षकांवर उत्साहाचा अभाव असल्याचा आरोप –
योगराज सिंग पुढे म्हणाले, “सर्व प्रशिक्षक आणि प्रशासक वातानुकूलित खोलीत बसून काम करू इच्छितात. पण मी इथे ४८ अंश सेल्सिअसच्या उष्णतेत, युवराज सिंगसारखे आणखी उत्कृष्ट क्रिकेटपटू घडवण्याच्या उत्कटतेने कार्यरत आहे.”





