“राम मुस्लिमांचेही पूर्वज , त्यांनी मुख्य प्रवाहात सामील व्हावे ; रामदेव बाबांचे आवाहन

Yoga Guru Ramdev Baba । योगगुरू रामदेव बाबा यांनी वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर होण्याला ‘ऐतिहासिक निर्णय’ म्हटले. त्यांनी “भारतात सर्व धर्मांसाठी एकच संविधान आणि एकच कायदा आहे, जो वक्फ कायद्यामुळे आणखी मजबूत होईल.” असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. हरिद्वारमध्ये रामनवमीनिमित्त एका वृत्तसंस्थेशी बोलताना स्वामी रामदेव यांनी हे विधान केले आहे.
योगगुरू रामदेव बाबा यांनी, “देशातील सर्व हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन आणि बौद्धांसाठी एकच संविधान, एकच कायदा आहे आणि वक्फ कायदा लागू केल्याने ही व्यवस्था मजबूत होईल. ” असे त्यांनी म्हटले. पुढे ते म्हणाले, “जर वक्फ कायदा बनवला नसता तर देशातील वेगवेगळ्या समुदायाच्या लोकांनी स्वतंत्र बोर्ड स्थापन करण्याची मागणी केली असती.” रामदेव म्हणाले की, काही राजकीय पक्ष मतांच्या राजकारणासाठी वक्फ विधेयकाला विरोध करत आहेत.
पक्षांनी व्होट बँकांचे ध्रुवीकरण करण्यासाठी निर्बंध लादले Yoga Guru Ramdev Baba ।
पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीवरील बंदी उठवण्याबाबत ते म्हणाले की, असे निर्बंध राजकीयदृष्ट्या प्रेरित मतपेढींचे ध्रुवीकरण करण्यासाठी लादले जातात. रामनवमी, जन्माष्टमी आणि ईद यासारख्या धार्मिक सणांवर कोणतेही निर्बंध नसावेत, असे त्यांनी सांगितले.
योगगुरू यांनी यावेळी, भारत हा राम, कृष्ण, हनुमान, शिव यांचा देश आहे जिथे सर्वांचा आदर केला जातो. ते म्हणाले की, हिंदुत्व कोणाचाही द्वेष करत नाही. रामदेव म्हणाले की, मुस्लिमांनीही त्यांच्या श्रद्धेवर आणि धर्मावर विश्वास ठेवला पाहिजे परंतु त्यांना हे देखील माहित आहे की राम त्यांचे पूर्वज देखील आहेत.” असा दावा त्यांनी यावली केला.
तसेच योगगुरू यांनी, रामनवमीच्या निमित्ताने, योगाला समर्पित संस्था, दिव्य योग मंदिर राममुलाख दरबार, पतंजली योगपीठामध्ये विलीन झाली आहे. या संदर्भात त्यांनी सांगितले की, योगाची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी योगाचार्य स्वामी लाल महाराज यांनी पतंजली योगपीठाला हे करून आपले बलिदान दिले आहे.
राम हे आपले राष्ट्र, धर्म आणि प्रतिष्ठा Yoga Guru Ramdev Baba ।
स्वामी रामदेव म्हणाले, “राम हे आपले राष्ट्र, धर्म, संस्कृती, आपला मूळ स्वभाव, आपली प्रतिष्ठा आहे.” ते म्हणाले, “आपले राष्ट्र असे बनले पाहिजे जिथे कोणीही आजारी, दुःखी आणि गरीब व्यक्ती नसेल आणि कोणत्याही मानवामध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेष किंवा शत्रुत्व नसेल, तरच रामराज्य स्थापित होऊ शकेल.”
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी वक्फ (दुरुस्ती) विधेयक, २०२५ ला मान्यता दिली, जे गेल्या आठवड्यात संसदेने जोरदार चर्चेनंतर मंजूर केले. या मंजुरीनंतर आता या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होणार आहे.





