Yoga For Dry Skin: हिवाळ्यात त्वचा होतेय कोरडी? हे योगासन देतील नैसर्गिक ओलावा आणि ग्लो

Yoga For Dry Skin: हिवाळा सुरू झाला की थंड हवा त्वचेची सर्वात जास्त परीक्षा पाहते. कितीही मॉइश्चरायझर लावलं तरी चेहऱ्यावरचा कोरडेपणा, पापुद्रे आणि निस्तेजपणा जात नाही. अशा वेळी केवळ स्किनकेअर नव्हे, तर योगासनसुद्धा त्वचेला आतून पोषण देतात. योगामुळे रक्तसंचार वाढतो, शरीर-मन शांत होतं आणि नैसर्गिक ग्लो त्वचेवर परत येतो.
योग हा तात्काळ चमत्कार नसला, तरी हळूहळू त्वचेला टिकाऊ ओलावा आणि सौंदर्य देणारी शक्ती आहे. तो रोजच्या दिनचर्येत समाविष्ट केला तर कोरडी त्वचा ही समस्या वाटतच नाही.
- योगाबरोबरच,
कोमट पाणी जास्त प्या - बदाम, अक्रोड, देसी तूप यांचे सेवन वाढवा
- मॉइश्चरायझर/फेस ऑइल दिवसातून 2–3 वेळा लावा
- रात्री नेहमी नैसर्गिक तेल लावा
कोरड्या त्वचेसाठी फायदेशीर योगासन
१. भुजंगासन
भुजंगासन केल्याने शरीरात रक्तप्रवाह सुधारतो आणि चेहऱ्यापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. त्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते आणि कोरडेपणा कमी होतो.
२. धनुरासन
हे आसन शरीरातील नैसर्गिक नमी संतुलित ठेवतं. मेटाबॉलिझम सुधारतो, पचन चांगलं होतं आणि परिणामी त्वचा कमी कोरडी होते.
३. सूर्यनमस्कार
सूर्यनमस्कार म्हणजे संपूर्ण शरीरासाठी एक संपूर्ण उपाय. हार्मोनल बॅलन्स सुधारून, शरीराला एनर्जी देऊन तो त्वचेला आतून हायड्रेट ठेवतो.
४. शवासन
तणाव हा कोरड्या त्वचेच मोठ कारण आहे. शवासन मन शांत करतं, स्ट्रेस कमी करतं आणि त्वचेची नैसर्गिक हीलिंग प्रोसेस वाढवत.
५. प्राणायाम
अनुलोम-विलोम, कपालभाती व भ्रामरी यांसारखे प्राणायाम शरीराला भरपूर ऑक्सिजन देतात. त्यामुळे चेहऱ्यावरची टाइटनेस, ड्राय पॅचेस कमी होतात आणि त्वचेला नवा तेज मिळतो.





