पुणे | एआयएसएमएसएसच्या आयओआयटीमध्ये योगदिन
Updated On:

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – एआयएसएमएसएस संस्थेच्या आयओआयटी महाविद्यालयाच्या केनेडी रोड कॅम्पसमध्ये संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यासमवेत योगा करत आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला.
स्वतःसाठी आणि समाजासाठी योग या संकल्पनेवर आधारित योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व सांगत चंद्रकांत देवडा यांनी मार्गदर्शन केले.
याशिवाय विविध योगासने आणि व्यायाम घेत योग दिवस साजरा केला. यासाठी संस्थेच्या क्रीडा प्रशिक्षक डॉ. दीपाली मोरे आणि संस्थेचे प्राचार्य डॉ. पी. बी. माने आणि सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.





