तायक्वांदो स्पर्धेत योधी अकादमीचे यश

पुणे – दक्षिण कोरियातील तायक्वांदोवान येथे नुकत्याच झालेल्या 16 व्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत पुण्यातील योधी तायक्वांदो अकादमीच्या विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद कामगिरी करत भारत देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या 10 देशांतून साधारण 3000 स्पर्धकांच्या या मांदियाळीत योधी तायक्वांदो अकादमीमधील खेळाडूंनी क्योरूगी (फाईट) आणि पुमसे स्पर्धेत पाच सुवर्ण, सहा रजत आणि नऊ ब्रॉंझ अशा एकूण 20 पदकांची कमाई केली.
योधी तायक्वांदो केडमीचे संस्थापक आणि मास्टर राजेश पुजारी (5 दान ब्लॅक बेल्ट) यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णा जोगळेकर – दोन सुवर्णपदक (क्योरूगी व पुमसे), रमा चिडगोपकर – सुवर्णपदक (क्योरूगी) आणि ब्रॉंझपदक (पुमसे), शिबानी मेंगाळे – रजतपदक ( क्योरूगी) सुवर्णपदक (पुमसे), काव्या सोमण – रजतपदक (क्योरूगी) रजत पदक (पुमसे), सम्यक लाहोटी – कांस्यपदक (क्योरूगी) ब्रॉंझपदक (पुमसे), श्लोक साठे – कांस्यपदक (क्योरूगी) रजतपदक (पुमसे), निशांत कुलकर्णी – रजतपदक (क्योरूगी) ब्रॉंझ दक (पुमसे), शर्व परांजपे – कांस्यपदक (क्योरूगी) ब्रॉंझपदक (पुमसे), सई दहितुले – रजतपदक (क्योरूगी) ब्रॉंझपदक (पुमसे), राजस कडुसकर – सुवर्णपदक (क्योरूगी) ब्रॉंझपदक (पुमसे) यांनी पदके मिळवली.
मास्टर राजेश पुजारी यांच्या योधी तायक्वांदो केडमीच्या पुण्यातील 15 शाखांमध्ये 300 विद्यार्थी आजमितीस प्रशिक्षण घेत आहेत. दक्षिण कोरियातील तायक्वांदोचे हेड क्वार्टरशी सलग 35 वर्षे संलग्न असलेले ग्रॅन्ड मास्टर चंद्रकांत भोसले (7 दान ब्लॅक बेल्ट) यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळेस आपल्या भारत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी योधी तायक्वांदो अकादमीच्या सुवर्णा जोगळेकर यांना मिळाली होती. वयाच्या 42 व्या वर्षी ही जोगळेकर यांची दोन्ही स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली.




