श्रीरामपूर : अँड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन अकॅडमीच्या तायक्वांदो संघाने तालुकास्तरीय आंतरशालेय तायक्वांदो स्पर्धेत ऐतिहासिक यश संपादन केले आहे. आर. नारायणराव बोरावके महाविद्यालय येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अकॅडमीने तब्बल ४९ पदके पटकावत झेंडा उंचावला. संघाने मिळवलेल्या एकूण ४९ पदकांमध्ये २७ सुवर्ण, १९ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश असून, ६० पैकी ४९ विद्यार्थी विजेते ठरले आहेत. यामुळे सर्वच खेळाडू आता जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये :- इरफान शेख, अनिकेत बडाख, अथर्व दांगट, श्रावणी आसने, यशश्री दुधेडिया, मंजीलिका हिवाळे, वैष्णवी गोरे, कैवल्य हिवाळे, आयुष ससे, आदेश तेलोरे, अश्विन फलके, ध्रुव मंगळूरकर, सार्थक भवर, प्रणव ढाकणे, यश गायधने, दीप लोखंडे, रुद्र मोरे, रोनक पठाण, प्रेरणा काळे, लावण्या डाखे, श्रेया फोपसे, श्रद्धा दळवी, अर्पिता यादव, संस्कृती पोपळघट, प्राप्ती राऊत, प्राजक्ता शिंदे, नक्षत्रा जगताप आदींचा समावेश आहे. रौप्यपदक विजेते :- अयान सय्यद, अर्णव त्रिभुवन, आदित्य यादव, रुद्र रोहमारे, शेख फरहान, सर्वेश बनभेरू, अर्पिता वर्मा, स्वरा वाघ, तनिक्षा पगारे, शाहिद शेख, कुशल कोठारी, रोनक कांकरीया, सर्वज्ञ फलके, अवधूत काळे, तेजस तेलोरे, अनन्या होले, धानी जैन, राधिका परदेशी, स्वरा बंगाळ हे आहेत. कांस्यपदक विजेते :- प्रियांशू राज, प्रज्ञा ओहळ व सत्यजीत गवळी ठरले. या शानदार कामगिरीबद्दल संघाचे प्रशिक्षक तेजस त्रिभुवन यांचे विशेष कौतुक करण्यात आले. तसेच संकुलाचे चेअरमन माजी प्राचार्य टी. ई. शेळके , व्हा. चेअरपर्सन डॉ. प्रेरणा शिंदे, खजिनदार डॉ. राजीव शिंदे, प्राचार्या वर्षा धामोरे, समन्वयक अमित त्रिभुवन, पर्यवेक्षिका सपना भायभंग व पर्यवेक्षक विजय रणदिवे ,कार्यालय अधीक्षक सतीश थोरात यांनी सर्व खेळाडूंना व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. या यशाबद्दल सर्व पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संघाचे अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.