Yemen News : येमेनमधील लष्करी तळावर हौथींचा हल्ला; 20 प्रशिक्षणार्थी सैनिक ठार
हौथी बंडखोरांनी आज येमेनमधील (Yemen News) सरकारी सैन्याच्या तळावर केलेल्या हल्ल्यामध्ये किमान २० सैनिक ठार झाले आहेत. येमेनच्या सैन्याच्यावतीने ही माहिती देण्यात आली. हौथींकडून अलिकडच्या काळात झालेल्या हल्ल्यांपैकी हा भीषण हल्ला होता.

Yemen News : हौथी बंडखोरांनी आज येमेनमधील (Yemen News) सरकारी सैन्याच्या तळावर केलेल्या हल्ल्यामध्ये किमान २० सैनिक ठार झाले आहेत. येमेनच्या सैन्याच्यावतीने ही माहिती देण्यात आली. हौथींकडून अलिकडच्या काळात झालेल्या हल्ल्यांपैकी हा भीषण हल्ला होता.
बंडखोरांनी येमेनच्या शाबवा प्रांतात अल-अलम या लष्करी तळावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात किमान दोन डझन सैनिक जखमी देखील झाले आहेत. जे सैनिक ठार झाले आहेत, ते या प्रशिक्षण तळावरील प्रशिक्षणार्थी सैनिक होते, असे येमेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.
शाबवा प्रांताची राजधानी अताकच्या उत्तरेला जरदान जिल्ह्यात असलेला हा तळ पूर्वी संयुक्त अरब अमिरातीचा पाठिंबा असलेल्या सशस्त्र गटाकडून वापरला जात असायचा. सरकारच्या ताब्यातील मरिब प्रांत आणि सरकारी फौजांना रसद पुरवली जाणाऱ्या मार्गावरच (Yemen News) हा तळ आहे.
रविवारी सौदीच्या नेतृत्वाखालील सैन्याने हौथींच्या ताब्यातील सादा प्रांतात केलेल्या हवाई हल्ल्यात पाच मुले आणि दोन महिलांसह ९ जण ठार झाले. या हल्ल्याबाबत सौदीकडून त्वरित कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
सौदीकडून येमेनमधील सरकारच्या मदतीसाठी हौथींवर हल्ले केले जाऊ लागल्यामुळे हौथीकडूनही सौदीत हल्ले होत आहेत. दोनच दिवसांपूर्वी अरामको कंपनीच्या मुख्यालयावर हौथींनी हल्ला केला होता. हौथीकडून येमेनच्या लाल समुद्राला लागून असलेला (Yemen News) आणि बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीला लागून असलेल्या भूभागावर ताबा मिळवला आहे.






