हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : पावसाळ्याच्या अडीच महिन्यात तालुक्यातील येलदरी येथील धरणाच्या जलाशयातील उपयुक्त पाणीसाठ्यात केवळ ३.९६ टक्के वाढ झाली. गतवर्षी याच दिवशी ८९.८७ टक्के एवढा जलसाठा उपलब्ध होता. येलदरी धरणाच्या पाण्यावर लाभक्षेत्रातील हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांसाठी सिंचनाचा लाभ होतो. शिवाय परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील अडीचशेपेक्षा जास्त गावे, वाड्या, तांडे यांची तहान भागवली जाते. यापुढेही पावसाने अशीच दडी दिल्यास उन्हाळ्यातील पाणीटंचाईसह पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यंदा वरुण राजाच्या नाराजीमुळे तालुक्यासह येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात फारच कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे जवळपास एक महिन्यापासून धरणातील पाणीसाठा ५९.९१ टक्क्यावर स्थिर आहे. ३० जूनला ५५.९५ टक्के तर ३० जुलै अखेर ५९.६३ टक्के जलसाठा उपलब्ध होता. त्यात चार दिवसांत किंचित वाढ झाली होऊन ५९.९१ टक्क्यांवर पोचला. जलसाठ्याची ही टक्केवारी अद्यापपर्यंत म्हणजे २५ ऑगस्टपर्यंत स्थिर आहे. येलदरी धरणाच्या जलाशयातील जिवंत पाणीसाठ्याची ८०९.७७० दशलक्ष घनमीटर तर एकूण पाणीसाठ्याची क्षमता ९३४.४४० दशलक्ष घनमीटर एवढी आहे. सद्यःस्थितीत गुरुवारी (ता. २५) सकाळी सहापर्यंत जिवंत पाणीसाठा ४८५.२०८ दशलक्ष घनमीटर तर एकूण ६०९.८७८ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध असून पाणीपातळी ४५८.२८०.मीटर एवढी होती. दरम्यान, जलसाठा.पुरेसा उपलब्ध नसल्याने येथील जलविद्युत निर्मितीदेखील बंद आहे. येलदरी धरणा विषय माहिती येलदरी हे धरण जिंतूर गावाजवळ आहे. येलदरी हे धरण पूर्णा नदीवर बांधण्यात आलेले आहे. १९६८साली तालुक्यातील येलदरी.या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. पूर्णा नदी गोदावरी नदीची प्रमुख उपनदी आहे.महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांच्या यादीत येलदरी धरणाचा ७वा क्रमांक लागतो. येलदरी धरण बांधण्याचा प्रकार मातीचा भराव व दगडी बांधकाम पण.बांधकाम मजबूत आहे. येलदरी धरणाची उंची ५१. २ मीटर म्हणजे १६८ फूट तर लांबी.४२३२मीटर म्हणजे १३८८५ फूट आहे..येलदरी धरणाची पाणी साठविण्याची क्षमता.३२.९९टीएमसी म्हणजे ३२९९० दशलक्ष घनफुट आहे. या धरणावर २२.५ मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. येलदरी धरणाला.१० दरवाजे आहेत.