यशवंत सिन्हा विरोधी आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार
Updated On:

नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधी आघाडीचे उमेदवार म्हणून आता माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. भाजपशी फारकत घेऊन सिन्हा यांनी मागील वर्षी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
यशवंत सिन्हा यांचे नाव पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूलनेच पुढे केले होते. आता त्यांच्या नावाची घोषणा काँग्रेसनेते जयराम रमेश यांनी केली आहे.
सर्व विरोधी पक्षांनी सिन्हा यांच्या उमेदवारीवर आज शिक्कामोर्तब केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. दुसरीकडे राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपने देखील तयारी केली असून सध्या 10 विचाराधीन आहे.





