#INDvAFG 1st T20 : टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मधून यशस्वी जैस्वाल बाहेर, BCCIने सांगितले ‘हे’ कारण…

India vs Afghanistan 1st T20 Match Playing XI : आज मोहाली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-20 मालिका आहे. त्याचबरोबर या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचेही टी-20 संघात पुनरागमन झाले आहे. विराट वैयक्तिक कारणांमुळे पहिला सामना खेळत नाहीये. त्याचबरोबर अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खान दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे.
नाणेफेकीचा (Toss) कौल हा भारतीय संघाच्या बाजूनं लागला आहे. कर्णधार रोहित शर्मानं गोलंदाजीचा निर्णय घेत अफगाणिस्तान संघास प्रथम फलंदाजीसाठी बोलवलं आहे. संजू सॅमसन हा सामना खेळत नाही. यष्टिरक्षक म्हणून जितेश शर्माला प्राधान्य देण्यात आले आहे. जितेशचे हे घरचे मैदान आहे. तो आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळतो.
मोहालीमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध खेळल्या जाणार्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या एक दिवस आधी, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पुष्टी केली होती की, यशस्वी जैस्वाल रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करेल. मात्र, तो सामन्याच्या दिवशी निवडीसाठी उपलब्ध नव्हता. अशा परिस्थितीत टीम इंडिया रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीसोबत खेळत आहे. जैस्वालला दुखापतीमुळे पहिल्या T20 मध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जैस्वाल याच्याबाबत अपडेट दिले आहे.
UPDATE: Mr Yashasvi Jaiswal was unavailable for selection for the first T20I due to a sore right groin.#INDvAFG
— BCCI (@BCCI) January 11, 2024
कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकदरम्यान यशस्वी जैस्वाल दुखापतीमुळे या सामन्याचा भाग नसल्याचे सांगितले होते. याशिवाय संघ व्यवस्थापन जितेश शर्माकडे यष्टिरक्षक म्हणून गेले आहे. संजू सॅमसनलाही फलंदाज म्हणून संधी मिळाली नाही कारण शिवम दुबेला संघात स्थान देण्यात आलं आहे. BCCI ने जैस्वाल याच्याबाबत अपडेट दिले आहे की, पाठीच्या खालच्या भागात उजव्या मांडीच्या दुखण्यामुळे तो पहिल्या सामन्यात निवडीसाठी उपलब्ध नव्हता. वेगवान गोलंदाज आवेश खान देखील प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहे, तर रवी बिश्नोईला स्पिनर म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे आणि त्यामुळे कुलदीप यादव बाहेर आहे.
IND vs AFG : दोन्ही संघाचे Playing 11 खालीलप्रमाणे…
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार.
अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमत शाह, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबदिन नायब, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान.
#INDvAFG 1st T20 : पहिल्याच सामन्यातून विराट कोहलीची माघार, समोर आलं ‘हे’ कारण…
दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतील पहिला टी-20 सामना 11 जानेवारीला मोहालीत, तर दुसरा सामना 14 जानेवारीला इंदूरमध्ये होणार आहे. 17 जानेवारी रोजी बेंगळुरूमध्ये तिसरा आणि अंतिम सामना होणार आहे.





