Jaiswal Ban Risk : यशस्वी जैस्वालवर बंदी? श्रीलंकेच्या गोलंदाजाशी पंगा घेतल्याने आयसीसीच्या रडारवर, नेमकं प्रकरण काय?
Jaiswal Ban Risk : आयसीसीच्या कडक नियमांमुळे जैस्वालवर सामने बंदीची टांगती तलवार निर्माण झाली आहे.

Yashasvi Jaiswal Faces ICC Level 4 Ban Threat Physical Clash Asitha Fernando : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि श्रीलंकेचा गोलंदाज असिथा फर्नांडो यांच्यात झालेली शारीरिक झटापट आता गंभीर वळणावर पोहोचली आहे. ४५ धावांवर बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतताना जैस्वालने फर्नांडोला हेल्मेटने डोक्यात धडक दिली होती. या प्रकरणावर दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिली असून, आयसीसीच्या कडक नियमांमुळे जैस्वालवर सामने बंदीची (Match Ban) टांगती तलवार निर्माण झाली आहे.
‘वातावरण गरम होतं, पण जैस्वालने जायला नको होतं!’; भारतीय प्रशिक्षकांचे स्पष्टीकरण
पहिल्या दिवसाच्या खेळाच्या समाप्तीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भारतीय फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी सांगितले, “गोलंदाजाने नक्कीच काहीतरी शेरेबाजी केली असणार. जे काही घडले ते त्या क्षणाच्या गरम वातावरणात आणि भावनेच्या भरात घडले. मैदानावर असे प्रसंग अनेकदा घडतात; मात्र तरीही यशस्वी जैस्वालने विरोधी संघाच्या खेळाडूंच्या तितक्या जवळ जायला नको होते.”
India Coach Reacts To Yashasvi Jaiswal On-Field Spat During 2nd Sri Lanka Test: “They Must’ve Said Something”https://t.co/IWKlWW0MSO pic.twitter.com/4jlJtnfmVE
— NDTV Sports (@Sports_NDTV) August 23, 2026
दुसरीकडे, श्रीलंकेचे गोलंदाजी प्रशिक्षक रायन वॅन नीकर्क यांनी प्रतिक्रिया देताना, “भावनेच्या भरात खेळाडूंकडून काही शब्द बाहेर पडतात, आता यावर काय कारवाई करायची याचा सर्व निर्णय मॅच रेफरींवर अवलंबून आहे,” असे स्पष्ट केले.
नेमकी कशी घडली होती घटना?
🥵 THINGS GET HEATED! 🥵
Yashasvi Jaiswal and Asitha Fernando exchange words as tensions rise in the middle. 👀
Watch #SLvIND, 2nd Test, LIVE NOW on Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #SonyLIV #BeautifulGameOfTestCricket pic.twitter.com/7qJrORjx8V
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 23, 2026
डावाच्या १७ व्या षटकात फर्नांडोने जैस्वालला ४५ धावांवर बोल्ड केले. बाद झाल्यानंतर जैस्वाल पॅव्हेलियनकडे जात असताना श्रीलंकेच्या गोलंदाजाने काहीतरी डिवचणारे शब्द उच्चारले. ते ऐकताच जैस्वाल मागे फिरला आणि संतापाने थेट फर्नांडोच्या अंगावर गेला. दोघांच्यात वाद वाढला आणि जैस्वालने आपल्या डोक्याने फर्नांडोच्या डोक्याला (हेल्मेटने) धडक दिली. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वा आणि पंचांनी मध्यस्थी करत दोघांना एकमेकांपासून दूर केले.
आयसीसीच्या लेव्हल-४ अंतर्गत कारवाईची भीती; न्यूझीलंड मालिकेतून होणार बाहेर?
यशस्वी जैस्वालने विरोधी खेळाडूवर शारीरिक हल्ला (Physical Contact) केल्याने त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ही कृती आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.१८ (ICC Code of Conduct Article 2.18) चे थेट उल्लंघन मानली जाते, ज्यामध्ये खेळाडू, पंच किंवा सपोर्ट स्टाफवर शारीरिक हल्ला करणे हा ‘लेव्हल-४’ चा गंभीर गुन्हा (Level 4 Offence) मानला जातो. मॅच रेफरींनी जैस्वालला दोषी ठरवल्यास त्याच्यावर काही कसोटी सामन्यांची बंदी घातली जाऊ शकते. यामुळे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला जैस्वाल मुकण्याची दाट शक्यता आहे.





