Jaiswal Fernando Fight : कोलंबो कसोटीत तुफान राडा! फर्नांडोने कोपर मारला अन् जैस्वालने थेट हेल्मेटने दिली टक्कर, पाहा VIDEO
Jaiswal Fernando Fight : जैस्वालला बाद केल्यानंतर फर्नांडोने केलेल्या आक्रमक शेरेबाजीमुळे संतप्त झालेला जैस्वाल थेट जाऊन भिडला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Yashasvi Jaiswal Asitha Fernando Heated On Field Altercation Video Viral : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी मैदानावर एक अत्यंत वादग्रस्त आणि धक्कादायक प्रसंग पाहायला मिळाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो (Asitha Fernando) यांच्यात खेळपट्टीवरच जोरदार वाद झाला. जैस्वालला बाद केल्यानंतर फर्नांडोने केलेल्या आक्रमक शेरेबाजीमुळे संतप्त झालेल्या जैस्वालने थेट त्याच्या अंगावर धावून जात हेल्मेटने धडक दिली.
४५ धावांवर क्लीन बोल्ड; फर्नांडोच्या आक्रमक ‘सेंड-ऑफ’ने पेटला वाद!
भारतीय डावाच्या १७ व्या षटकात ही नाट्यमय घटना घडली. राउंड द विकेट मारा करणाऱ्या असिथा फर्नांडोचा चेंडू आत आला आणि यशस्वी जैस्वालने तो पंच करण्याचा प्रयत्न केला; मात्र चेंडू बॅटची इनसाइड एज घेऊन थेट स्टंपवर आदळला. जैस्वाल ५३ चेंडूंत ९ चौकारांसह ४५ धावांवर बाद झाला. जैस्वाल बाद झाल्यानंतर शांतपणे पॅव्हेलियनकडे जात असताना, फर्नांडोने त्याच्या दिशेने पाहत अत्यंत आक्रमक पद्धतीने जल्लोष करत शेरेबाजी केली आणि मैदानाबाहेर जाण्याचा इशारा केला.
फर्नांडोने कोपर मारला अन् जैस्वालने थेट हेल्मेटने दिली टक्कर!
🥵 THINGS GET HEATED! 🥵
Yashasvi Jaiswal and Asitha Fernando exchange words as tensions rise in the middle. 👀
Watch #SLvIND, 2nd Test, LIVE NOW on Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #SonyLIV #BeautifulGameOfTestCricket pic.twitter.com/7qJrORjx8V
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 23, 2026
फर्नांडोचे उद्दाम शब्द ऐकताच जैस्वाल संतापाने मागे फिरला. दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ आले आणि त्यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान, फर्नांडोने जैस्वालला डिवचत कोपर (Elbow) मारल्याचे दिसताच जैस्वालचा संयम सुटला आणि त्याने थेट आपल्या हेल्मेटने फर्नांडोला जोरात टक्कर मारली. मैदानावरील परिस्थिती हाताबाहेर जाताना पाहून श्रीलंकेच्या इतर खेळाडूंनी आणि पंचांनी तत्काळ धाव घेत दोघांना एकमेकांपासून बाजूला केले. पॅव्हेलियनमध्ये परततानाही जैस्वाल मागे वळून फर्नांडोला सुनावत होता.
दोन्ही सलामीवीर बाद; भारताला पहिल्या सत्रात मोठे धक्के!
Y Jaiswal and Asitha Fernando involved in a Heated exchange.
TEST CRICKET NEVER FAILS TO PRODUCE MOMENTS LIKE THAT. 🥶🔥#SLvIND pic.twitter.com/zoCrOSZ953
— Rana Ahmad. (@AhmadRana056) August 23, 2026
असिथा फर्नांडोने सुरुवातीला काही चौकार खाल्ले असले तरी त्याने आपल्या भेदक माऱ्याने भारताच्या दोन्ही सलामीवीरांना पहिल्याच सत्रात माघारी धाडले. उपकर्णधार केएल राहुलला १८ धावांवर बाद केल्यानंतर त्याने सेट झालेल्या जैस्वालला बाद केले. पहिल्या कसोटीत अपयशी ठरलेल्या जैस्वालचे महत्त्वाचे अर्धशतक अवघ्या ५ धावांनी हुकले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून आयसीसीच्या (ICC) आचारसंहितेनुसार या दोन्ही खेळाडूंवर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.





