Kiara Advani : प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या मातृत्वाचा पुरेपूर आनंद घेत आहे. तिने नुकतेच पती सिद्धार्थ मल्होत्रासह तिच्या पहिल्या बाळाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. आई झाल्यानंतर कियाराने बॅालिवूडमध्ये कमबॅक कधी कमबॅक करणार अशी चर्चा होती. अखेर याचे उत्तर मिळाले असून, कियाराने एक मोठा सिनेमा साईन केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूडची प्रसिद्ध ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी यांच्या जीवनावर आधारित एक बायोपिक सिनेमा येणार आहे. या सिनेमाची अॅाफर कियाराला मिळाली आहे. गेल्या वर्षी सिद्धार्थ पी. मल्होत्राने “कमल और मीना” नावाच्या बायोपिकची घोषणा केली होती. तेव्हापासून चाहते या सिनेमात मीना कुमारीची भूमिका कोण साकारणार याची आतुरतेने वाट पाहत होते. या भूमिकेसाठी अनेक नावांचा चर्चा होती. विशेषतः कृती सेनन आणि कियारा अडवाणी यांच्यातून कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते. अखेर कियारा अडवाणी हिच्या नावावर शिक्ता मोर्तेब झाला असून, ती मीना कुमारी यांची व्यक्तिरेखा मोठ्या पडद्यावर साकारताना पाहायला मिळणार आहे. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, दिग्दर्शकाने कियारामध्ये असे गुण पाहिले जे मीना कुमारी यांच्या व्यक्तिरेखेला जिवंत करू शकतात. त्यामुळे या व्यक्तिरेखेसाठी तिच्या नावाची निवड करण्यात आली. हा सिनेमा मीना कुमारी आणि कमाल अमरोही यांच्या प्रेमकथेवर आधारित असणार आहे. ज्यामध्ये त्यांच्या नात्यातील चढ-उतार दाखवले जातील. वृत्तानुसार, पुढील वर्षी या सिनेमाच्या शुटिंगला सुरूवात केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या सिनेमातील भूमिका कियारासाठी आव्हानात्मक असल्याने खूप मेहनत तिला घ्यावी लागणार आहे. हेही वाचा : मेक्सिकोमध्ये भीषण आग ; अनेक मुलांसह २३ जणांचा होरपळून मृत्यू