शिंदे गटाकडून मुस्लिम महिलांना बुरखा वाटप; विरोधकांकडून टीका म्हणाले,’संधी साधू राजकारण..’

Yamini Jadhav Distribute Of Burqas । राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक लागणार आहे. या निवडणुकीसाठी राज्यातील दोन्ही आघाडीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अशात आता शिंदे गटातील नेत्या यामिनी जाधव यांनी मुस्लिम महिला मतदारांवर लक्ष केंद्रित केले असून मुंबईच्या भायखळा परिसरात शिंदे गटाच्या बॅनरखाली बुरखा वाटपाचा कार्यक्रम घेतला आहे.
मुंबईत शिंदे गटातील नेत्यांकडून येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मतांचे समीकरण आखण्यात येत आहे. अशात आता मुंबईतील भायखळा परिसरात मुस्लिम महिलांना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांनी बुरखा वाटप केल्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून टीका होत आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर दोन्ही आघाडीच्या घटक पक्षांना दलित आणि ,मुस्लीम वोट बँक आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला आहे. याचा सर्वात मोठा नोटा भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. अशातच आता यामिनी जाधव यांनी आपला भायखळ्याचा गड राखण्यासाठी पुन्हा एकदा मुस्लिम समुदायाला खेचण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे. यामिनी जाधव यांनी पक्षाच्या बॅनरखाली मुस्लिम महिलांना बुरखा वाटपाचा कार्यक्रम घेतला. यामिनी जाधव आपला भायखळ्याचा गड राखण्यासाठी आता पुन्हा एकदा मुस्लिम समुदायाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. पण या निमित्ताने पुन्हा एकदा शिवसेनेवर संधी साधू राजकारण केल्याचा गंभीर आरोप होत आहे.





