‘या’ सिनेमांचा सुपडा साफ! बॅाक्स अॅाफिसवर ‘कांतारा चॅप्टर 1 ची’ दहाड; पाहा आतापर्यंतचे एकूण कलेक्शन…

Kantara Box Office : सध्या चित्रपटगृहांमध्ये बॉलिवूडपासून ते दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टींपर्यंत अनेक मोठे सिनेमे सुरू आहेत. आता गुरुवारचे बॅाक्स अॅाफिस कलेक्शन समोर आले असून, कांतारा चॅप्टर १ ने सगळ्या सिनेमांना मागे टाकले आहे. “कांतारा चॅप्टर १,” “सनी संस्कार की तुलसी कुमारी,” “दे कॉल हिम ओजी,” आणि “जॉली एलएलबी ३” या सिनेमांना बॅाक्स अॅाफिसवर मोठा प्रेक्षक वर्ग लाभलेला आहे. मात्र, या साऱ्यात ऋषभ शेट्टीच्या कांताराने बाजी मारली असून, बॅाक्स अॅाफिसवर आपला दरारा निर्माण केला आहे.
गुरुवारी या सिनेमाने २०.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत कांतारा चॅप्टर १ ची एकूण कमाई ३३४.९४ कोटी रुपयांची झाली आहे. जर ही कमाई अशीच सुरू राहिली तर हा सिनेमा लवकरच ५०० कोटी पर्यंत जाऊन पोहचेल. तर दुसरीकडे इतर सिनेमांचा सुपडा साफ झाल्याचे चित्र आहे.
सनी संस्कारी की तुलसी कुमारी सिनेमाच्या कमाईत मोठी घट झाली आहे. पहिल्या दिवशी ९.२५ कोटींची कमाई करणाऱ्या या सिनेमाने गुरुवारी अवघ्या २ कोटी रुपयांची कमाई केली. या सिनेमाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर ४०.७५ कोटींची कमाई केली आहे.
दक्षिण अभिनेता पवन कल्याणच्या “दे कॉल हिम ओजी” या सिनेमाच्या कमाईत आता लक्षणीय घट झाली आहे. पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ६३.७५ कोटींची कमाई सिनेमा करू शकला आहे. गुरुवारी १५ व्या दिवशी सिनेमाने अवघे ७.५ लाख रुपयांची सर्वांत कमी कमाई केली. या सिनेमाला आतापर्यंत बॅाक्स अॅाफिसवर १८७.६५ कोटी रुपयांचा गल्ला गोळा करता आला आहे.
अक्षय कुमार आणि अर्शद वारसी स्टारर “जॉली एलएलबी ३” सिनेमा सुरुवातीला प्रचंड हिट झाला होता, पण आता त्याची कमाई कमी होऊ लागली आहे. बॉक्स ऑफिसवर १२ कोटी कमाई करणाऱ्या या सिनेमाने गुरुवारी फक्त ३.८ लाखांची कमाई केली आहे. या सिनेमाने आतापर्यंत एकूण ११०.१८ कोटी रुपयांचे बॅाक्स अॅाफिस कलेक्शन गोळा केले आहे.





