टायगर श्रॉफच्या ‘बागी 4’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्रीची लागली वर्णी

Baaghi 4 | अभिनेता टायगर श्रॉफच्या ‘बागी 4’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढली आहे. या चित्रपटात संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटातील त्याचा जबरदस्त लुक शेअर करण्यात आला आहे. यानंतर आता या चित्रपटाबाबत आणखी एक अपडेट समोर येत आहे. या चित्रपटात कोणत्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार, याबाबत स्वत: टायगर श्रॉफने माहिती दिली आहे.
अभिनेत्री सोनम बाजवाची ‘बागी ४’मध्ये दिसणार आहे. फिल्ममेकर साजिद नाडियाडवाला यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सोनम बाजवा ‘बागी ४’मध्ये प्रमुख भूमिका साकारणार असल्याचं सांगितलं. टायगर श्रॉफने कॅप्शनमध्ये लिहिले की, “रिबेल कुटुंबातील नवीन सदस्याचं स्वागत. बागी युनिव्हर्स, साजिद नाडियादवाला यांच्या ‘बागी ४’ मध्ये सोनम बाजवाचा सहभाग झाल्याने मी खूप उत्साही आहे.”
From the laughs of the #HousefullUniverse to the action-packed #BaaghiUniverse, #SonamBajwa is here to steal the show! 🖤🔥 Welcome to the Rebel League #Baaghi4! #SajidNadiadwala’s #Baaghi4
Directed by @NimmaAHarshaReleasing in cinemas on 5th Sept 2025 @iTIGERSHROFF… pic.twitter.com/HWRnnCZo6p
— Nadiadwala Grandson (@NGEMovies) December 10, 2024
‘बागी’ युनिव्हर्समध्ये याआधी दिशा पाटनी आणि श्रद्धा कपूर या अभिनेत्री झळकल्या होत्या. आता ‘बागी ४’ मध्ये सोनम बाजवा मुख्य हिरोईन म्हणून काम करणार आहे. 5 सप्टेंबर 2025 ला ‘बागी 4′ सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. बागी ४’ सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. ‘बागी’ युनिव्हर्सचे याआधीचे तीनही सिनेमे प्रचंड गाजले. आता या चित्रपटाच्या चौथ्या भागासाठी चाहते उत्सुक आहेत. Baaghi 4 |
‘बागी’ हा एक ॲक्शन-थ्रिलर चित्रपट आहे, ज्याचा पहिला भाग 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. याचे दिग्दर्शन सब्बीर खान यांनी केले होते. तर अहमद खान दिग्दर्शित ‘बागी 2’ 2018 साली रिलीज झाला होता. दुसऱ्या हप्त्यात टायगरसोबत दिशा पटानी, मनोज बाजपेयी, दर्शन कुमार, प्रतीक बब्बर, रणदीप हुडा आणि दीपक डोबरियाल होते. चित्रपटाचा तिसरा भाग देखील अहमद खानने दिग्दर्शित केला होता, यात टायगर श्रॉफ, रितेश देशमुख आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होते.





