प्रभासच्या ‘फौजी’ चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट आली आहे. या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेसाठी एका बॉलिवूड अभिनेत्याची निवड करण्यात आली आहे. साऊथचा सुपरस्टार प्रभास सध्या त्याच्या अनेक चित्रपटांच्या निर्मितीमध्ये व्यस्त आहे, त्यातील एक चित्रपट म्हणजे फौजी. या चित्रपटाची अपडेट वेळोवेळी चित्रपटकर्मी देत असतात. या चित्रपटाच्या सेटवर आता एका बॅालीवूड अभिनेत्याची एन्ट्री होणार असल्याची माहिती त्यांनी शेअर केली आहे. या चित्रपटाचे शूटिंग सध्या आरएफसी, हैदराबादमध्ये सुरू असून प्रभास या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात प्रभाससोबत जेष्ठ अभिनेते अनुपम खेर हे स्क्रीन शेअर करणार आहे. तसेच प्रभाससोबत या चित्रपटात आणखी काही बॉलिवूड कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. अभिनेते खेर यांचा कार्तिकेय 2 आणि टायगर नागेश्वर राव नंतर हा त्यांचा तिसरा तेलुगु चित्रपट असणार आहे. फौजी हा चित्रपट एक ॲक्शन ड्रामा असणार आहे, ज्यामध्ये प्रभास एका आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती यूवी क्रिएशन्स करत आहे. यासोबतच प्रभास त्याच्या इतर चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. प्रभास मारुती दासरी दिग्दर्शित हॉरर कॉमेडी ‘द राजा साब’चे शूटिंगही करत आहे, ज्याची निर्मितीही मोठ्या प्रमाणावर होत आहे. फौजी चित्रपटाची निर्मिती मैत्री मुव्ही मेकर्स यांनी केली आहे. या चित्रपटात प्रभाससोबत अभिनेत्री इमावी मुख्य भूमिकेत असणारआहे. या बिग बजेट चित्रपटाला विशन चंद्रशेखर यांनी संगीत दिले आहे.