Xi Jinping in France : नवीन शीतयुद्ध थांबवण्यासाठी चीनला मदत करा; जिनपिंग यांचे मॅक्रॉ यांना आवाहन

पॅरिस – नवीन शीतयुद्ध थांबवण्यासाठी फ्रान्सने चीनला मदत करावी, असे आवाहन फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेले चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांना केले आहे. आज या दोन्ही नेत्यांमध्ये बहुचर्चित द्विपक्षीय चर्चा झाली. त्यावेळी जिनपिंग यांनी हे आवाहन केले. चीन आणि फ्रान्स दरम्यानच्या परस्पर हिताच्या संबंधांना जपण्याच्या महत्वावर त्यांनी भर दिला. पुरवठा साखळीतील अडथळांना दोन्ही देशांनी संयुक्तपणे विरोध करावा, असा आग्रह देखील जिनपिंग यांनी मॅक्रॉ यांना केला.
युरोपीय संघ सातत्याने अमेरिकेची बाजू घेत असल्यामुळे सुरक्षा विषयक धोके आणि व्यापारी तणाव देखील निर्माण होतो आहे. हे शीतयुद्ध थांबवण्यासाठी फ्रान्सने चीनची मदत करावी, असा आग्रह त्यांनी धरल्याचे चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने म्हटले आहे.
चीनच्या गुंतवणूक संंधी अमेरिकेमुळे दुर्लक्षित केल्या जात असल्याचा दावा जिनपिंग युरोपीय संघाच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच्या चर्चेमध्ये करणार आहेत, असेही वृत्तसंस्तेने म्हटले आहे.
झेलेन्स्कींच्या हत्येचा कट उघड; युक्रेनच्याच दोन सुरक्षा अधिकाऱ्यांना अटक
रशिया-युक्रेन युद्ध, व्यापारी निर्बंध, वाहतुक साखळीतील वर्चस्ववादाच्या लढाईमुळे युरोपीय संघाचे आणि चीनचे संबंधही बिघडले आहेत. युरोपीय व्यापारी संबंधांना चीन अनुकुल बनवण्याचाही प्रयत्न जिनपिंग यांच्याकडून केला जातो आहे. फ्रान्सचा दौरा संपवल्यानंतर जिनपिंग सर्बिया आणि हंगेरीच्या दौऱ्यावर जाणार आहेत.





