दबाव सहन करणार नाही ! मोदींसमोर जिनपिंग यांचा SCO व्यासपीठावरून ट्रम्प यांना थेट इशारा ; म्हणाले, शीतयुद्ध

XI JINPING। चीनच्या तियानजिन याठिकाणी आजपासून सुरू झालेल्या शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी जगातील सध्याच्या परिस्थितीवर मोठे विधान केले. आपल्या भाषणात शी जिनपिंग यांनी, “सर्व देशांनी न्याय आणि निष्पक्षतेच्या तत्त्वांचे पालन करावे आणि शीतयुद्धाची मानसिकता, गटबाजी आणि दबाव यासारख्या कृतींना एकत्रितपणे विरोध करावा” असे म्हणत एकजुटीचा नारा दिला. या दरम्यान, त्यांनी एससीओ शिखर परिषदेत उपस्थित असलेल्या नेत्यांना – रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदेश दिला, ज्यात जागतिक शांतता आणि सहकार्यावर भर दिला.
चीन आणि अमेरिकेत तणाव का आहे? XI JINPING।
शी जिनपिंग यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा चीन आणि अमेरिकेतील तणाव वाढला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेने चीनवर प्रचंड कर लादले, ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये १०० टक्क्यांहून अधिक कर लादून व्यापार युद्ध सुरू झाले. नंतर करार झाला असला तरी, तणाव अजूनही कायम आहे आणि आता त्याचा परिणाम रशिया आणि भारतापर्यंत पोहोचला आहे.
ट्रम्प यांनी युद्धबंदीसाठी पुतिनवर दबाव आणला XI JINPING।
ट्रम्प यांनी अलीकडेच युक्रेन युद्धादरम्यान रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर ५०% कर लादला आहे. तसेच, ट्रम्प पुतिनवर युद्धबंदीसाठी सतत दबाव आणत आहेत. त्यांनी अलास्कामध्ये पुतिन यांची भेट घेतली आणि त्यानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली.
एससीओ शिखर परिषदेत कोणते देश सहभागी होत आहेत?
एससीओ शिखर परिषदेची सुरुवात ३१ ऑगस्ट रोजी चीनमधील तियानजिन येथे झाली आणि ती दोन दिवस चालेल. त्यात चीन, भारत, रशिया, पाकिस्तान, इराण, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि बेलारूस यांचा समावेश आहे. याशिवाय, १६ देश निरीक्षक किंवा संवाद भागीदार म्हणून सहभागी आहेत.





