WTC Points Table 2024-25 : एका पराभवामुळे टीम इंडियाचे मोठं नुकसान..! जाणून घ्या, WTC पॉइंट टेबलचे ताजे अपडेट….

WTC Points Table 2024-25 : बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंड संघानं भारताचा आठ गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे संघाचे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही मोठे नुकसान झाले आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ 74.24 च्या विजयाच्या टक्केवारीसह अव्वल होता, परंतु आता संघाची विजयाची टक्केवारी 68.06 वर आली आहे. मात्र, त्यानंतरही भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. या यादीत ऑस्ट्रेलिया 62.50 विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे.
न्यूझीलंडचा मोठा फायदा
बंगळुरूमध्ये भारताचा पराभव करून न्यूझीलंडला मोठा फायदा झाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये किवी संघ 44.44 विजयाच्या टक्केवारीसह थेट चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, इंग्लंड संघ आता पाचव्या स्थानावर घसरला आहे, जो आधी चौथ्या स्थानावर होता. भारत आणि ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंका संघ यादीत तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याची विजयाची टक्केवारी 55.56 आहे.
New Zealand move into fourth place in the World Test Championship standings after taking 12 points in Bengaluru #INDvNZ pic.twitter.com/T2p5NiEPth
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 20, 2024
पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तानचे स्थान काय आहे?
भारताचा शेजारी देश पाकिस्तान जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. येथे संघ फक्त वेस्ट इंडिजच्या पुढे आहे, ज्याची विजयाची टक्केवारी 18.52 आहे. पाकिस्तानच्या वर बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका संघ आहेत, ज्यांची विजयाची टक्केवारी अनुक्रमे 34.38 आणि 38.89 आहे.
अंतिम फेरीची शर्यत अधिक रोमांचक…
तसं पाहिलं तर भारत आणि ऑस्ट्रेलियाचा अव्वल दोन संघांमध्ये समावेश झाल्यानंतरही अंतिम फेरीतील दोन संघ अद्याप निश्चित झालेले नाहीत. संघांमधील लढती जसजशी वाढत आहेत, तसतशी अंतिम फेरीची शर्यत अधिक रोमांचक होत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाशिवाय श्रीलंका, न्यूझीलंड आणि इंग्लंडचे संघही अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यासाठी दावेदार आहेत.





