IND vs NZ Test Series (Team india Squad Update) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, या पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाच्या संघात मोठा बदल केला आहे.
वास्तविक, अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी सुंदरचा भारतीय संघात समावेश झाला आहे. याबाबत बीसीसीआयने एक्स (ट्विटर) माहिती दिली आहे.
🚨 News 🚨
Squad Update: Washington Sundar added to squad for the second and third Test#INDvNZ | @IDFCFIRSTBank
Details 🔽
— BCCI (@BCCI) October 20, 2024
वॉशिंग्टन सुंदरने टीम इंडियासाठी मार्च 2021 मध्ये अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. आतापर्यंत त्याने भारताकडून चार कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 6 डावात फलंदाजी करताना त्याने 66.25 च्या सरासरीने 265 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 3 अर्धशतके झळकावली आहेत. सुंदरची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या नाबाद 96* धावा आहे. याशिवाय त्याने 7 डावात गोलंदाजी करताना 49.83 च्या सरासरीने 6 बळी घेतले आहे.
पहिल्या कसोटीत न्यूझीलंड 8 विकेट्सने विजयी…
पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे पूर्णपणे वाहून गेला. त्यादिवशी नाणेफेकही होऊ शकली नाही. दुसऱ्या दिवशी नाणेफेक झाली आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या डावात सर्वबाद 46 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव 402 धावांवर संपला. अशाप्रकारे किवी संघाकडे 356 धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात भारतीय संघाने 462 धावा केल्या आणि 106 धावांची आघाडी घेतली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 27.4 षटकांत 2 गडी गमावून 107 धावांचे लक्ष्य सहज गाठले.