WTC Points Table (2023-2025) | इंग्लंडचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, विश्वकसोटी अजिंक्यपद फायनलची बदलली समीकरणे…

ख्राईस्टचर्च – तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने यजमान न्यूझीलंड संघाचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयासह इंग्लंडनेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. रविवारी येथील हॅगले ओव्हलवर झालेल्या या विजयाचा खरा नायक ठरला तो ब्रेडन कार्स त्याने दुसऱ्या डावात 42 धावांत 6 बळी घेत किवी संघाचे कंबरडे मोडले. या विजयामुळे, इंग्लंडला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा फायदा झाला आहे.
Exciting changes in the standings as the race to the #WTC25 Final heats up 🤩
More ➡ https://t.co/5lIuiKChEe pic.twitter.com/cyWgptbq5I
— ICC (@ICC) December 1, 2024
या विजयानंतरही इंग्लंड सहाव्या स्थानावर असला तरी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. फायनलमध्ये पोहोचण्याची त्यांची शक्यता आता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. भारताचा 3-0 असा पराभव केल्यानंतर न्यूझीलंड अंतिम फेरी गाठण्याचा दावेदार ठरला होता. इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर त्याची समीकरणे बदलली आहेत. आता न्यूझीलंड अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी इंग्लंडविरुद्धचे शेवटचे दोन कसोटी सामने जिंकावे लागतील. पॉइंट टेबलमध्ये तो भारताला कडवी टक्कर देत होता, पण त्याच्या पराभवामुळे भारताला मोठा फायदा झाला आहे.
या पराभवानंतर न्यूझीलंडच्या गुणांची टक्केवारी (पीसीटी) 50 झाली आहे. यामुळे चौथ्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेची बरोबरी झाली आहे. आता या मालिकेत इंग्लंड संघाला 2-1 ने पराभूत केले, तरी त्यांची गुणांची टक्केवारी केवळ 57.14 पीसीटीपर्यंत पोहोचू शकेल. अशा परिस्थितीत फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता फारशी नाही. मात्र, जर काही मोठी उलथापालथ झाली आणि इतर संघांचे निकाल त्याच्या बाजूने लागले तर तो पुढे जाऊ शकतो. पाकिस्तानमधील मालिका पराभवानंतर इंग्लंडच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या, परंतु त्यांनी पीसीटी 43.75 पर्यंत वाढवली आहे. आता 3-0 मालिका जिंकूनही त्याच्या गुणांची टक्केवारी 50 च्या वर नेऊ शकत नाही.
भारत पहिल्या स्थानावर कायम…
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत पहिल्या स्थानावर कायम आहे. दुसरीकडे, श्रीलंकेविरुद्ध दणदणीत विजय मिळवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यांनी विद्यमान चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या स्थानावर ढकलले आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पुढील वर्षी इंग्लंडमध्ये गुणतालिकेत अव्वल दोन संघांमध्ये खेळवला जाईल.





