WTC Final 2025 : WTC चॅम्पियन दक्षिण आफ्रिका संघावर पैशांचा पाऊस ऑस्ट्रेलियासह इतर संघांना किती मिळाले बक्षीस?

WTC Final 2025 Prize Money list : दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या तिसऱ्या चक्राचा (2023-25) विजेतेपदाचा मान मिळवला. लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेच्या विजयात एडन मार्करमने शतक झळकावून महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर विजेत्या संघासह इतर संघावर पैशांचा पाऊस पाडण्यात आला आहे.
विजेत्या आणि उपविजेत्याला किती मिळालं बक्षीस?
डब्ल्यूटीसी चॅम्पियन दक्षिण आफ्रिकेवर पैशांचा पाऊस पडला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ३.६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (सुमारे ३१ कोटी रुपये) बक्षीस रक्कम मिळाली आहे, जी २०२१ आणि २०२३ मध्ये देण्यात आलेल्या १.६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा खूपच जास्त आहे. तर उपविजेत्या संघाला २.१६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (सुमारे १८.६३ कोटी रुपये) मिळाले आहेत. गेल्या सायकलमध्ये, उपविजेत्या संघाला ८०,००० डॉलर्स मिळाले होते.
The moment all of South Africa had been waiting for 🇿🇦🏆#WTC25 #SAvAUS pic.twitter.com/tmgZGbkFFy
— ICC (@ICC) June 14, 2025
इतर कोणत्या संघांना मिळालं बक्षीस?
तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भारतीय संघाला १,४४०,००० डॉलर्स (१२.४२ कोटी रुपये) बक्षीस रक्कम मिळाली. चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडला सुमारे १०.३५ कोटी रुपये (१,२००,००० डॉलर्स) मिळाले. इंग्लंड (सुमारे ८.२८ कोटी रुपये), श्रीलंका (सुमारे ७.२४ कोटी रुपये), बांगलादेश (सुमारे ६.२१ कोटी रुपये), वेस्ट इंडिज (सुमारे ५.१७ कोटी रुपये) आणि पाकिस्तान (सुमारे ४.१४ कोटी रुपये) यांनाही बक्षीस रक्कम मिळाली. डब्ल्यूटीसी २०२३-२५ साठी, आयसीसी ने ९ संघांमध्ये एकूण ५.७६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (सुमारे ४९.६८ कोटी रुपये) बक्षीस रक्कम वाटली आहे, जी मागील दोन आवृत्त्यांच्या तुलनेत दुप्पट आहे. त्यामुळे कोणत्या संघाला किती रक्कम बक्षीस म्हणून मिळाली, ते जाणून घेऊया.
हेही वाचा – WTC Final 2025 : अखेर २७ वर्षांनी दक्षिण आफ्रिकेने पुसला ‘चोकर्स’ टॅग, काय आहे त्याचा इतिहास? जाणून घ्या
जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२३-२५ ची बक्षीस रक्कम खालीलप्रमाणे आहे:
- विजेता (दक्षिण आफ्रिका): ३१ कोटी रुपये
- उपविजेता (ऑस्ट्रेलिया): १८.६३ कोटी रुपये
- तिसरा क्रमांक (भारत): १२.४ कोटी रुपये
- चौथा क्रमांक (न्यूझीलंड): १०.३५ कोटी रुपये
- पाचवा क्रमांक (इंग्लंड): ८.२८ कोटी रुपये
- सहावा क्रमांक (श्रीलंका): ७.२४ कोटी रुपये
- सातवा क्रमांक (बांगलादेश): ६.२१ कोटी रुपये
- आठवा क्रमांक (वेस्ट इंडीज): ५.१७ कोटी रुपये
- नववा क्रमांक (पाकिस्तान): ४.१४ कोटी रुपये





