WTC Final 2025 : भारत WTC मधून बाहेर ! ‘या’ 2 संघांमध्ये रंगणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची बॉर्डर गावसकर मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत भारताचा 3-1 ने पराभव झाला. यातील शेवटचा सामना हा 3 ते 5 जानेवारी दरम्यान सिडनी येथे खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 6 विकेट्सने पराभव करून विजय मिळवला. टीम इंडियाने तब्बल 10 वर्षांनी बॉर्डर गावसकर टेस्ट सीरिज गमावली. या पराभवानंतर भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमधून देखील बाहेर पडावे लागले.
Circle June 11 in your calendars 🗓️
The stage is set for the #WTC25 Final 🏏
More ➡️ https://t.co/0ceIOalXDI pic.twitter.com/OlQoR2fbtp
— ICC (@ICC) January 5, 2025
‘या’ 2 संघांमध्ये रंगणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल
भारताविरुद्धची टेस्ट सीरिज जिंकून ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी क्वालिफाय झाली आहे. ऑस्ट्रेलिया हा WTC फायनलमध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरला असून यापूर्वी दक्षिण आफ्रिका संघ WTC फायनलसाठी पहिल्या क्रमांकावर क्वालिफाय झाला होता.
कधी पार पडणार WTC फायनल?
लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळवली जाणार आहे. 11 जून 2025 पासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलला सुरुवात होणार असून विजेतेपदाची गदा पटकावण्यासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे.





