Sikandar Shaikh : पैलवान सिकंदर शेखच्या गाडीचा अपघात; चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण, नेमकं काय घडलं?
Sikandar Shaikh : या प्रकरणाचा तपास हायवे पोलिसांकडून सुरू असून तपासानंतरच अधिकृत माहिती दिली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Sikandar Shaikh : महाराष्ट्र केसरी किताब पटकावून राज्यातील कुस्तीप्रेमींच्या मनात स्थान निर्माण करणारा पैलवान सिकंदर शेख याच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर कुस्तीविश्वात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून अपघाताचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी परिसरात रत्नागिरी-नागपूर महामार्गावर हा अपघात झाला. सिकंदर शेखच्या थार गाडीने रस्त्यावरील साईड डिव्हायडरला धडक दिल्याचे सांगितले जात आहे. Sikandar Shaikh
मात्र, अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच, अपघाताच्या वेळी सिकंदर शेख स्वतः गाडीत होता की नाही, याबाबतही स्पष्टता झालेली नाही.

Sikandar Shaikh : पैलवान सिकंदर शेखच्या गाडीचा अपघात; चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण, नेमकं काय घडलं?
या प्रकरणाचा तपास हायवे पोलिसांकडून सुरू असून तपासानंतरच अधिकृत माहिती दिली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. अपघाताच्या स्वरूपावरून काही जणांना किरकोळ दुखापत झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, सिकंदर शेख गंभीर जखमी झाल्याची कोणतीही पुष्टी अद्याप झालेली नाही. (Sikandar Shaikh)
दरम्यान, गेल्या वर्षी पंजाबमधील एका प्रकरणामुळे सिकंदर शेख चर्चेत आला होता. त्यानंतर त्याने दमदार पुनरागमन करत अनेक कुस्ती स्पर्धांमध्ये यश मिळवले होते. अशातच आता त्याच्या गाडीच्या अपघाताची बातमी समोर आल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Sikandar Shaikh)





