Tokyo Olympics | पदक जिंकण्याचे आव्हान – पुनिया
Updated On:

नवी दिल्ली – जपानमध्ये येत्या 23 जुलैपासून सुरू होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे आव्हान असते. मात्र, त्यातही कुस्तीत 65 किलो वजन हा जास्त कठीण गट मानला जातो. याच गटात मला यशस्वी व्हायचे आहे, असे मत भारताचा अव्वल कुस्तीपटू बजरंग पुनियाने व्यक्त केले आहे.
जागतिक दर्जाचे कुस्तीपटूदेखील या गटात खेळण्यासाठी व जिंकण्यासाठी आतुर असतात. मलाही टोकियो अलिम्पिकमध्ये याच गटात खेळायचे आहे. या गटातील प्रत्येक फेरीतील विजय हा जगभरातील सगळ्या कुस्तीपटूंना त्यांच्या गुणवत्तेची साक्ष देणारा ठरतो.
याच गटात सरस कामगिरी करत देशासाठी पदक जिंकण्याचे माझे स्वप्न आहे आणि ते निश्चितच पूर्ण होईल, असा विश्वासही पुनियाने व्यक्त केला.





