Budapest Wrestling Ranking Series 2024 : भारताच्या अमन सेहरावतने पटकावलं रौप्य पदक…

Budapest Wrestling Ranking Series 2024 : भारतीय फ्रीस्टाइल कुस्तीपटू अमन सेहरावतने गुरुवारी हंगेरीतील बुडापेस्ट येथे पॉलीक इमरे आणि वर्गा जानोस मेमोरियल रेसलिंग रँकिंग सिरीज स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. या रौप्य पदकामुळे आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी अमनचे मानांकन वाढण्यास मदत होईल.
Wrestling: Aman Sehrawat wins Silver medal at Budapest Ranking Series.
Aman lost to former World Champion Rei Higuchi 1-11 in Final (FS 57kg). #WrestleBudapest pic.twitter.com/lwRdFA699t
— India_AllSports (@India_AllSports) June 6, 2024
2023 चा आशियाई चॅम्पियन कुस्तीपटू अमनला पुरुषांच्या 57 किलो गटाच्या अंतिम फेरीत माजी विश्वविजेता आणि रिओ 2016 ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता जपानच्या ‘री हिगुची’ कडून 5 मिनिटे 30 सेकंद चाललेल्या सामन्यात 11-1 ने पराभव पत्करावा लागला. हिगुची हा दोन वेळा जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेता आहे, त्याने 2022 आणि 2023 मध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकले होते.
तत्पूर्वी, भारतीय पुरुष कुस्तीपटू अमनने 5 मिनिटे 9 सेकंद चाललेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत 9व्या स्थानावर असलेल्या आर्यन त्स्युट्रिनचा 14-4 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
ISSF World Cup 2024 : वर्ल्डकप नेमबाजीत भारताच्या ‘सरबजोत सिंग’चा सुवर्णवेध….
या स्पर्धेत भाग घेणारा अमन सेहरावत हा भारतातील एकमेव पुरुष कुस्तीपटू होता. गेल्या महिन्यात, 20 वर्षीय भारतीय कुस्तीपटूने इस्तंबूल, तुर्की येथे जागतिक ऑलिम्पिक कुस्ती पात्रता स्पर्धेद्वारे भारतासाठी पॅरिस 2024 ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे.





