कृषिमंत्र्यांची काळजी करण्यापेक्षा शेतकऱ्यांची काळजी करा; कोकाटेंच्या वक्तव्यावरून रोहित पवार भडकले

Rohit Pawar On Manikrao Kokate | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना खडेबोल सुनावले होते. देवगिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह इतर मंत्र्यांना ‘एकदा-दोनदा चूक झाली तर समजून घेऊ, मात्र तिसऱ्या वेळी चूक केल्यास माफी नाही, तर मंत्रिपद बदलू’, असा थेट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. Ajit Pawar |
त्यानंतर पुन्हा एकदा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कांद्याच्या दरावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कांद्याचे बाजारभाव पडायला शेतकरीच जबाबदार आहेत. एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून, बाकी सगळे कांदा लावत सुटतात’ असं विधान माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. Manikrao Kokate |
आमदार रोहित पवार म्हणाले, कांद्याला चांगला भाव मिळाला की शेतकरी कांदाच लावत सुटतात आणि कांद्याचे भाव पडतात हा तर्क आहे महाराष्ट्र राज्याचे महान कृषिमंत्री कोकाटे साहेबांचा. कांद्याचे दर थोडेफार उत्पादन वाढल्याने पडत नाहीत, तर केंद्र सरकारच्या निर्यात बंदी, निर्यात शुल्क यासारख्या धोरणांमुळे आणि झोपलेल्या राज्य सरकारमुळे पडतात, असं रोहित पवार यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना म्हणाले, राज्याच्या कृषिमंत्र्यांनी आपले ब्रम्ह ज्ञान शेतकऱ्यांना देण्याऐवजी केंद्र सरकारला दिले तर अधिक बरे होईल. कृषिमंत्री पद हे अत्यंत जबाबदारीचे पद आहे, परंतु विद्यमान कृषि मंत्र्यांना मात्र त्यांची जबाबदारी अजूनही समजलेली दिसत नाही, त्यामुळे नेतृत्वाने कृषिमंत्र्यांची राजकीय काळजी करण्यापेक्षा शेतकऱ्यांची काळजी करावी. अजितदादांनी धाडसी निर्णय घेऊन ज्याला शेतीची समज आहे, संवेदना आहे अशा जबाबदार व्यक्तीकडे कृषिमंत्री पद सोपवायला हवे, असं रोहित पवार म्हणाले.
आमदारांचे पगार थांबवा, एसटी कर्मचाऱ्यांचे पगार आधी करा
रोहित पवार म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना पगार देण्याऐवजी फक्त वल्गना करण्यातच हे सरकार धन्यता मानताना दिसत आहे. या महिन्याची १० तारीख आली तरी पगार होत नाहीत, या महिन्यात तर केवळ ५५% पगार म्हणजे २०००० पगार असेल तर केवळ ११००० पगार झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी निम्म्या पगारात घर चालवायचं तरी कसं? अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री यावर बोलतील, ही अपेक्षा. तसेच पुढे म्हणाले, सरकारकडे एसटीला द्यायला पैसे नसतील तर आमदारांचे, मोठ्या अधिकाऱ्यांचे पगार थांबवा, पण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार आधी करा, ही विनंती, असं रोहित पवार म्हणाले. Rohit Pawar |
काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
माणिकराव कोकाटे म्हणाले, एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून, बाकी सगळे कांदा लावत सुटतात, कांद्याची लागवड किती करावी यालाही मर्यादा आहे, दुप्पट तिप्पट ठीक पण पन्नास पटीने कांद्याची लागवड करायला लागले, तर कांद्याचे बाजारभाव पडणारच, अशा शब्दात कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी कांद्याच्या बाजारभावावरुन शेतकऱ्यांना खडेबोल सुनावलं आहे. त्यामुळे कोकाटे यांच्या या वक्तव्यावरून आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. Manikrao Kokate |




