वर्ल्ड टीव्ही प्रीमियर: खास बालदिनानिम्मित बच्चेकंपनीच्या मनोरंजनासाठी ‘अलबत्या गलबत्या’

सध्या कोरोनामुळे आपण सगळेच घरी आहोत. अनेक बालकांना घरी राहण्याचा कंटाळा आला आहे. तर बालदिनानिमित्त वैभव मांगले या बच्चेकंपनी साठी खास मेजवानी घेऊन येणार आहे. त्याचं बालनाट्य अलबत्या गलबत्या या नाटकांचं पहिला वर्ल्ड टीव्ही प्रिमियर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वाट पाहून पाहून दमले गं बाई, किती दिवस झाले कोरोनामुळे नाट्यगृह बंद होती, तुम्हालाही भेटता येत नव्हतं पण आता हे चित्र बदललंय, नाट्यगृह पुन्हा सुरू होतायत, तुम्ही प्रेक्षकानी जरूर यायचं नाट्यगृहात न घाबरता सुरक्षेची सगळी काळजी घेऊन..तोपर्यंत खास बालदिनानिम्मित बच्चेकंपनीच्या मनोरंजनासाठी ही चिंची चेटकीण येतेय तुमच्या घरी पाहायला विसरू नका ‘अलबत्या गलबत्या’ रविवार 15 नोव्हेंबरला दुपारी 12 आणि संध्या. 7 वा. फक्त झी मराठीवर.
तुम्ही येत नाही मग मी ठरवलं तुम्हालाच एक दिवस भेटायला यायचं पण हा एकच दिवस हा.. याचं रिपीट टेलिकास्ट लागणार नाही.. यानंतर मी तुम्हाला भेटेन डायरेक्ट नाट्यगृहात.. मग भेटूया 15 तारखेला झी मराठीवर.. किती गं बाई मी हुशार, किती गं बाई मी हुशार.
एकदा माझी जादूची आगपेटी सापडू दे नाय जाळला ना या करोनाला तर नाव लावणार नाय चिंची चेटकीण..


