वैभव बनला संगीततज्ञ
Updated On:

संगीताच्या रिऍलिटी शो मधून सातत्याने नवीन टॅलेन्टचा शोध घेतला जात असतो. “सारेगमप’च्या धर्तीव आता असाच एक भन्नाट रिऍलिटी शो येतो आहे. त्याचे परिक्षण करण्यासाठी देवकी पंडीत आणि अवधूत गुप्ते असणार नाहीत, तर हास्य अभिनेता वैभव मांगले असणार आहे. वैभव मांगले स्वतः उत्तम गायक आहे. त्याच्यावर किशोरी अमोणकर यांच्या गायनाची छाप आहे. वैभवला शास्त्रीय संगीताचीही चांगली जाण अहे. आतापर्यंत वैभवच्या अभिनयाला प्रेक्षकांनी पाहिले आहे. आता त्याच्यातील संगीत तज्ञ आपण पाहणार आहोत. “युवा सिंगर, एक नंबर’ या रिऍलिटी शो मधून नवीन टॅलेन्ट वैभव शोधणार आहे.





