World Toilet Day : जागतिक शौचालय दिनानिमित्त विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे
World Toilet Day : जागतिक शौचालय दिनानिमित्त पी.एम. शहा फाउंडेशनतर्फे चंद्रकांत दरोडे प्राथमिक विद्यालयात स्वच्छतागृह वापर आणि हात धुण्याबाबत जनजागृती.

World Toilet Day : जागतिक शौचालय दिनानिमित्त पी.एम. शहा फाउंडेशनच्या वतीने चंद्रकांत दरोडे प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह वापराबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका संगीता अंत्रे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतागृहांचा योग्य वापर, स्वच्छता राखण्याची जबाबदारी आणि शौचालय वापरल्यानंतर साबणाने हात धुण्याचे महत्त्व प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले.
पी.एम. शहा फाउंडेशनच्या वतीने पुण्यातील निवडक शाळांमध्ये ‘शालेय स्वच्छतागृहे व पिण्याचे सुरक्षित पाणी’ हा उपक्रम वर्षभर राबवला जातो. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतागृहांच्या वापराबाबत जागरूकता निर्माण करणे आणि शाळा प्रशासनाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमाला विद्यार्थी आणि शाळा प्रशासनाचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे फाउंडेशनचे संचालक ॲड. चेतन गांधी यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी फाउंडेशनचे प्रा. अरुण फडतरे, सरस्वती मेहता, रूपाली चव्हाण, आदिती शितोळे, रवींद्र कावरे, आकाश जाधव तसेच विद्यालयाच्या सुवर्णा बागल आणि शोभा नगरे यांनी पुढाकार घेतला.





