World Cup News : विश्वकरंडक स्पर्धेचा मसुदा तयार; वाचा….
Updated On:

मुंबई -भारतात येत्या ऑक्टोबर व नोव्हेंबर या कालावधीत एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा होत आहे. या स्पर्धेतील भारत व पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघातील लढत 15 ऑक्टोबरला गुजरातच्या अहमदाबादेतील नरेंद्र मोदी स्टेडियमवर घेण्याचे बीसीसीआयने निश्चित केले आहे.
तसेच अन्य लढतीची केंद्रेही जवळपास निश्चित झालेली आहेत. त्याबाबतचा मसुदा बीसीसीआयने आयसीसीकडे पाठवला आहे. आता आयसीसीकडून या स्पर्धेतील सर्व देशांच्या क्रिकेट मंडळांना तो पाठवला जाणार असून, त्यांच्या मान्यतेनंतरच अधिकृत वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.





