World Cup 2023 : कोण होणार Sixer King? टॉप-5 मध्ये ऑस्ट्रेलियाचे 3 तर भारत आणि आफ्रिकेच्या एका फलंदाजाचा समावेश…

Most Sixes In World Cup 2023:भारतात सुरु असेलल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यांचा टप्पा रविवारी संपला. आता उपांत्य फेरीचे दोन सामने अनुक्रमे मुंबई व कोलकाता इथे रंगणार आहेत.
उपांत्य फेरीचा पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बुधवारी भारत व न्यूझीलंड यांच्यात तर दुसरा सामना दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरूवारी रंगणार आहे.
एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या स्पर्धेत पाच फलंदाज आहेत ज्यांनी 20 पेक्षा जास्त षटकार मारले आहेत. विश्वचषकाचा सिक्सर किंग बनण्याची त्यांच्यातील घोडदौड खूपच रंजक आहे.विशेष म्हणजे या पाचही फलंदाजांचे संघांनी उपांत्य फेरी गाठलेली आहे.
1. वर्ल्ड कप 2023 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या शर्यतीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा अव्वल स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत 24 षटकार मारले आहेत.
2.या यादीत ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल दुसऱ्या क्रमांकावर आहे. मॅक्सवेलने केवळ 7 सामन्यात 22 षटकार मारले आहेत.
3.दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉकही मागे नाही. या प्रोटीज(SA) फलंदाजाने लीग टप्प्यात 21 षटकार ठोकले आहेत.
4.ऑस्ट्रेलियाचा शक्तिशाली अष्टपैलू मिचेल मार्श 20 चौथ्या स्थानावर आहे. त्याने 8 सामन्यात 20 षटकार मारले आहेत.
5.ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचाही या टॉप-5 यादीत समावेश आहे. वॉर्नरनेही आतापर्यंत 9 सामन्यात 20 षटकार मारले आहेत.





