World Cup 2023 : पाकचा पराभव करत गुणतालिकेत टीम इंडियाची अव्वलस्थानी झेप, तर पाच वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया..

World Cup 2023 Points Table Update : विश्वचषक 2023 स्पर्धेत टीम इंडियानं सलग तिसऱ्या विजयाची नोंद करत न्यूझीलंड संघास मागे टाकत गुणतालिकेत अव्वल स्थान काबिज केले आहे. भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर या स्पर्धेत चांगली सुरुवात केली आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात पाचवेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला पराभूत करून आपले इरादे स्पष्ट केले होते. यानंतर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला.
विश्वचषकाच्या 12व्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्धचा हा सलग आठवा विजय आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. टीम इंडियाने 1992, 1996, 1999, 2003, 2011, 2015 आणि 2019 मध्ये पाकिस्तानचा पराभव केला आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज झालेल्या सामन्यात मोठ्या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. भारताचे आता तीन सामन्यांत सहा गुण झाले आहेत. न्यूझीलंडचेही सहा गुण आहेत, मात्र चांगल्या नेट रनरेटच्या आधारे रोहित शर्माचा संघ पहिल्या स्थानावर आहे. भारतीय संघाचा नेट रनरेट +1.821 झाला आहे तर न्यूझीलंड संघाचा नेट रनरेट +1.604 आहे.
Pakistan lose 8/36 ☝️
Rohit slams 86 💥
Hosts go top of the table 🫡The huge match in Ahmedabad went India’s way.
Read the full report 📝 ⬇️https://t.co/wlx0GXeyCx
— ICC (@ICC) October 14, 2023
तिसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिका तर चौथ्या स्थानी पाकिस्तान आहे. दोन्ही संघाचे 6 गुण आहेत. पण दक्षिण आफ्रिकेचा रनरेट चांगला आहे. त्यामुळे ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आफ्रिकेचा नेट रनरेट +2.360 तर पाकचा नेट रनरेट -0.137 इतका आहे. यानंतर गुणतालिकेत इंग्लंड पाचव्या अन् बांगलादेश सहाव्या स्थानी आहे. इंग्लंडचा संघाचा रनरेट +0.5 इतका आहे. इंग्लंड संघाला दोन सामन्यात एक विजय आणि एका सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. तर बांगलादेश संघाला तीन सामन्यापैकी दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. बांगलादेशचा नेट रनरेट – 0.699 इतका आहे.
श्रीलंकेचा संघ सातव्या तर नेदरलँडचा संघ आठव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत नवव्या तर अफगाणिस्तानचा संघ दहाव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, नेदरलँड आणि श्रीलंका या चारही संघाला अद्याप विजयाचे खाते उघडता आले नाही.
पाचवेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलियाचा संघ तळाला आहे. ऑस्ट्रेलियाला विश्वचषकातील दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्यांदा भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा नेटरनरेट -1.846 इतका खराब झाला आहे.
दरम्यान, टीम इंडियाचा पुढचा सामना 19 ऑक्टोबरला पुण्यात बांगलादेशशी होणार आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा संघ 20 तारखेला बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.





