जागतिक बॅंकेचे प. बंगालला 125 दशलक्ष डॉलर्स कर्ज

नवी दिल्ली – भारत सरकार, पश्चिम बंगाल सरकार आणि जागतिक बॅंकेने पश्चिम बंगाल राज्यातील गरीब आणि असुरक्षित गटांना सामाजिक सुरक्षा सेवा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना मदत म्हणून 125 दशलक्ष डॉलर्स कर्जासंबंधी करारावर स्वाक्षरी केली.
पश्चिम बंगाल रोजगार पुरवणारे 400 हून अधिक कार्यक्रम चालवते. यापैकी बहुतेक सेवा जय बांग्ला नावाच्या एकछत्री मंचाद्वारे पुरवल्या जातात. यात विशेषत: महिला, आदिवासी आणि अनुसूचित जातीतील कुटुंबे आणि वृद्ध, तसेच राज्याच्या आपत्ती-प्रवण किनारी भागातल्या कुटुंबांवर लक्ष केंद्रित केले जाईल.
हा प्रकल्प राज्य सरकारच्या क्षमतांचा विस्तार करण्यासाठी आणि राज्यातील गरीब आणि असुरक्षित गटांसाठी सामाजिक सहाय्य आणि लक्ष्यित सेवा सुगम्य करण्यावर भर देईल. पश्चिम बंगाल वित्त विभागाचे सचिव सुदीप कुमार सिन्हा आणि जागतिक बॅंकेच्या वतीने जुनैद अहमद यांनी या करारावर स्वाक्षरी केली.





