मेट्रोच्या वीजवाहक तारांचे काम सुरू

तीन स्वतंत्र वीज उपकेंद्र

मेट्रो प्रकल्पासाठी 132 केव्ही क्षमतेची तीन स्वतंत्र उपकेंद्र कार्यान्वित करण्यात येणार असून या केंद्राच्या माध्यमातून मेट्रोचा वीजपुरवठा 24 तास सुरळीत ठेवला जाणार आहे. त्यातील एक केंद्र पिंपरी-चिंचवड मध्ये असणार असून एक केंद्र वनाज डेपोच्या परिसरात तर एक उपकेंद्र गणेशखिंड येथे असणार आहे. तसेच मेट्रोला अविरत वीजपुरवठ्यासाठी महावितरणकडून एक्‍सप्रेस वाहिनीद्वारे वीज पुरवठा केला जाणार आहे.

पुणे  – मेट्रो प्रकल्पाला वीजपुरवठा करण्यासाठी आवश्‍यक तारा बसविण्याचे काम महामेट्रोने सुरू केले आहे. त्यासाठी ओव्हरहेड ट्रॅक्‍शन केबलसाठीचे खांब बसविण्यास रविवारपासून सुरूवात करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड ते दापोडी या प्राधान्य मार्गावर हे खांब बसविण्यात येत आहेत.
पुणे मेट्रोमध्ये 25,000 व्होल्ट एसी ट्रॅक्‍शन पॉवर ओव्हरहेड कॅटेनरी सिस्टम वापरली गेली आहे. ट्रॅक पातळीपासून 9.1 मीटर उंचीच्या गॅल्वनाइज्ड स्टील ट्यूबचे हे खांब असणार आहेत.

या दोन खांबांमधील अंतर हे सरासरी 35 ते 40 मीटर आहे. हे खांब बसविण्यासाठी 50 टन क्षमतेची विशेष क्रेन वापरण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड ते दापोडी हा सुमारे 7 किलोमीटरचा मार्ग डिसेंबर 2019 पर्यंत सुरू करण्याचे नियोजन असून या मार्गावर सुमारे 162 विद्युतवाहक तारांचे खांब उभारले जाणार आहेत. ऑक्‍टोबर 2019 पर्यंत काम पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन असून त्यासाठी दररोज 4 ते 5 खांब बसविण्यात येणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.