Tokyo Olympics | जलतरणपटू माना ऑलिम्पिकला पात्र
Updated On:

मुंबई – भारताची अनुभवी महिला जलतरणपटू माना पटेल टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. माना पटेल टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरणारी पहिली महिला तसेच तिसरी भारतीय जलतरणपटू ठरली आहे.
माना 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात सहभागी होणार आहे. श्रीहरी नटराज आणि साजन प्रकाश यांच्यानंतर टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरलेली माना देशाची तिसरी जलतरणपटू आहे.
साजन प्रकाशने 200 मीटर बटरफ्लाय आणि श्रीहरी नटराज यांनी 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये पात्रता मिळवली. मानाने उझबेकिस्तान ओपन जलतरण स्पर्धेत 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये 1 मिनीट 04.47 अशी वेळ देताना सुवर्णपदक जिंकताना ऑलिम्पिक पात्रताही मिळवली.





