Women’s Reservation : 2029 च्या निवडणुकीत 33 टक्के महिलांना संधी; टीडीपीची ऐतिहासिक घोषणा
तेलुगु देशम पार्टीने आपल्या महानाडू या सर्वात मोठ्या वार्षिक अधिवेशनात महिला सक्षमीकरणाच्या (Women's Reservation) दृष्टीने अत्यंत ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल उचलले.

Women’s Reservation : तेलुगु देशम पार्टीने आपल्या महानाडू या सर्वात मोठ्या वार्षिक अधिवेशनात महिला सक्षमीकरणाच्या (Women’s Reservation) दृष्टीने अत्यंत ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल उचलले.
टीडीपीचे कार्याध्यक्ष आणि मंत्री नारा लोकेश यांनी २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत (Women’s Reservation) पक्षांतर्गत महिलांना ३३% आरक्षण (तिकिटे) देण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
भारतीय राजकारणात अशा प्रकारची थेट घोषणा करणारा टीडीपी हा देशातील पहिलाच पक्ष ठरला आहे. यंदाच्या महानाडू अधिवेशनाची मुख्य थीम स्त्री शक्ती ठेवण्यात आली आहे.
त्यामुळे ही घोषणा (Women’s Reservation) केवळ राजकीय नसून महिला नेतृत्व आणि लैंगिक समानतेप्रती पक्षाची वैचारिक बांधिलकी दर्शवणारी आहे, असे मत नारा लोकेश यांनी व्यक्त केले.
या निर्णयामुळे राजकारणात महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढून एका नव्या राजकीय युगाची सुरुवात होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हा प्रस्ताव अशा वेळी आला आहे, जेव्हा संसदेत महिला आरक्षण विधेयकाला अद्यापही राजकीय अडथळे आणि विरोधकांचा सामना करावा लागत आहे.
राष्ट्रीय पातळीवर राजकीय सहमती कधी बनेल याची वाट न पाहता, टीडीपीने स्वतः कृती करून देशासमोर एक आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.पक्षाने केवळ निवडणुकांमध्येच नव्हे, तर आपल्या संघटनात्मक रचनेतही महिलांचे प्रतिनिधित्व वाढवले आहे.
याचाच एक भाग म्हणून, खासदार बायरेड्डी शबरी यांची पक्षाच्या पहिल्या महिला राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. टीडीपीचे हे पाऊल महिला नेतृत्व तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.






