Women’s Jr. Asia Cup 2024 : टीम इंडियाची उपांत्य फेरीत धडक, थायलंडचा केला दारूण पराभव…

Women’s Junior Asia Cup 2024 (India vs Thailand) : दीपिकाच्या चार गोलांच्या जोरावर गतविजेत्या भारताने थायलंडचा 9-0 असा धुव्वा उडवताना महिला ज्युनियर आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे आणि यासह आगामी ज्युनियर विश्वचषकासाठीही पात्रताही मिळवली आहे.
Full time
Women’s Junior Asia Cup 2024 All matches live on our Facebook Page 📷https://t.co/96z0kTREmx#asiahockey#WJAC2024 pic.twitter.com/sygCeT0tt1— Asian Hockey Federation (@asia_hockey) December 12, 2024
भारताने यापूर्वी पाच संघांच्या स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये बांगलादेशचा 13-1 आणि मलेशियाचा 5-0 असा पराभव करून शानदार विजय नोंदवले होते. स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना शनिवारी तर अंतिम फेरी रविवारी होणार आहे.
IND vs AUS 3rd Test : गाबाची पुनरावृत्ती होणार नाही – मिचेल मार्श
भारताकडून लढतीत सामन्यात साक्षी राणा हीने (17′) एक, कनिका सिवाच हीने पेनल्टी कॉर्नर व्दारे (23′,25′,40′) तीन, लालरिनपुई हीने एक(27′) आणि दीपिका हीने दोन पेनल्टी कॉर्नरव्दारे (28′,31′) तर दोन मैदानी (35′,55′)गोल केले.





