Women’s Jr. Asia Cup 2024 : दीपिकाची हॅट्ट्रिक..! भारताने मलेशियाचा 5-0 ने उडवला धुव्वा….

Women’s Junior Asia Cup 2024 (IND vs MAS) : गतविजेत्या भारताने दीपिकाच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर सोमवारी महिला ज्युनियर आशिया चषक सामन्यात मलेशियाचा 5-0 असा पराभव करून सलग दुसरा विजय नोंदवला. स्पर्धेच्या इतिहासात मलेशियावर भारताचा हा सलग तिसरा विजय आहे. या संघाने यापूर्वी 2015 मध्ये 9-1 आणि 2023 मध्ये 2-1 असा विजय मिळवला होता.
Dominance on Display 🇮🇳🔥
Team India secured a resounding 5-0 victory against Malaysia in their second match of the Junior Women’s Asia Cup 2024🏆
The defending champions are on a winning streak, showcasing skill, teamwork, and determination.
Let’s keep the momentum going💪✨… pic.twitter.com/pjn7j23kJg— Hockey India (@TheHockeyIndia) December 9, 2024
रविवारी बांगलादेशला 13-1 ने पराभूत केल्यानंतर, भारताला मलेशियाविरुद्धच्या सामन्यात सुरुवातीचा गोल करण्यासाठी संघर्ष करावा लागला, कारण मलेशियाची बचाव फळी भारताच्या प्रयत्नांना सातत्याने हाणून पाडत होती.
Women’s Jr. Asia Cup 2024 : भारतीय संघाची विजयी सलामी,बांगलादेशचा 13-1 ने उडवला धुव्वा….
सामन्याच्या उत्तरार्धात वैष्णवी फाळकेच्या (32व्या मिनिटाला) गोलनंतर भारतीयांनी एका पाठोपाठ सलग तीन गोल केले. यादरम्यान दीपिकाने (37व्या, 39व्या, 48व्या) सलग दुसऱ्या सामन्यात हॅट्ट्रिक केली तर कनिका सिवाचने (38व्या) संघासाठी आणखी एक गोल केला.



