Womens Hockey World Cup : भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 6-1 ने दणदणीत विजय; सलग 11 वा सामना जिंकून राखले निर्विवाद वर्चस्व!
महिला हॉकी वर्ल्डकप २०२६ मध्ये (Womens Hockey World Cup) भारतीय महिला संघाने आपल्या धडाकेबाज कामगिरीने प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवली आहे.

Womens Hockey World Cup : महिला हॉकी वर्ल्डकप २०२६ मध्ये (Womens Hockey World Cup) भारतीय महिला संघाने आपल्या धडाकेबाज कामगिरीने प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवली आहे. पहिल्या सामन्यात तगड्या चीनला २-२ अशा बरोबरीत रोखल्यानंतर, दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ६-१ असा धुव्वा उडवून शानदार विजय साकारला.
या विजयासह भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे आपले निर्विवाद (Womens Hockey World Cup) वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेपासून दक्षिण आफ्रिकेला भारताविरुद्ध एकदाही विजय मिळवता आलेला नसून, भारताचा हा त्यांच्याविरुद्धचा सलग ११ वा विजय ठरला आहे.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी आक्रमक चाली रचत सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले. ११ व्या मिनिटाला सुनेलिता टोप्पोने अप्रतिम मैदानी गोल डागत आफ्रिकन संघावर प्रचंड दबाव निर्माण केला. पहिल्या क्वॉर्टरमधील १-० च्या आघाडीनंतर दुसऱ्या सत्रात नवनीत कौर आणि पुखरमबम यांनी सुरेख गोल करत ही आघाडी ३-० वर नेली.
तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये भारतीय संघाने (Womens Hockey World Cup) आक्रमणाची धार आणखी वाढवत दोन गोल डागले, तर शेवटच्या सत्रात आणखी एका गोलची नोंद करत स्कोअर थेट ६-० असा नेऊन ठेवला. सामना संपायला अवघी काही मिनिटे बाकी असताना दक्षिण आफ्रिकेने एक सांत्वनपर गोल केला, ज्यामुळे सामना ६-१ अशा मोठ्या फरकाने भारताच्या नावावर झाला.
१९७४ च्या पहिल्या वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरी गाठल्यानंतर भारताला या स्पर्धेत फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नव्हती. २०२२ च्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ नवव्या स्थानावर फेकला गेला होता. मात्र, यंदाची ही दमदार सुरुवात पाहता भारताच्या (Womens Hockey World Cup) पुढील फेरीच्या आणि पदकाच्या आशा कमालीच्या उंचावल्या आहेत. आता संपूर्ण देशाचे लक्ष २० ऑगस्ट रोजी रंगणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड या हायव्होल्टेज सामन्यावर लागले आहे.






