#WIvIND 1st Test : वेस्ट इंडिजचा Toss जिंकून फलंदाजीचा निर्णय

West Indies Vs India 1st Test :- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना डॉमिनिका येथे खेळवला जात आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
टीम इंडियासाठी दोन खेळाडूंनी पदार्पण केले आहे. २१ वर्षीय यशस्वी जैस्वाल पहिला सामना खेळणार आहे. त्याला रोहित शर्माने कसोटी कॅप दिली. त्याचवेळी इशान किशनला पहिल्यांदा कसोटी खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात तो केएस भरतच्या जागी विकेटकीपिंग करेल. विराट कोहलीने इशानला टेस्ट कॅप दिली आहे.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11 खालीलप्रमाणे –
वेस्ट इंडिज : क्रेग ब्रॅथवेट (सी), तेजनारिन चंदरपॉल, रेमन रेफर, जर्मेन ब्लॅकवुड (वीसी), अॅलिक अटान्झे, जोशुआ डी सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिसेन.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.
दरम्यान, भारत Team India 12 वर्षांनंतर डॉमिनिका येथे कसोटी सामना खेळणार आहे. या मैदानावर भारतीय संघ शेवटचा सामना 2011 मध्ये खेळला होता आणि तो सामना अनिर्णित राहिला होता. टीम इंडियाला आतापर्यंत येथे फक्त एकच सामना खेळता आला आहे. त्याची ही येथे दुसरी कसोटी असेल. 2002 पासून भारताने वेस्ट इंडिजमध्ये एकही कसोटी गमावलेली नाही. टीम इंडियाचा शेवटचा पराभव 2002 मध्ये वेस्ट इंडिजमध्ये झाला होता. त्यानंतर टीम इंडियाने सहा कसोटी जिंकल्या असून सात सामने अनिर्णित राहिले आहेत.





