Black Magic : राष्ट्रवादीच्या नेत्याच्या घराबाहेर जादूटोण्याचा प्रकार; घटना CCTV मध्ये कैद, तळेगाव दाभाडेत खळबळ…!

Black Magic : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे स्थानिक नेते सुहास गरूड यांच्या घराबाहेर एका अज्ञात महिलेने लिंबू, कुंकू आणि टाचण्यात वापरून करणी करण्याचा प्रयत्न केला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २९ जुलै रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे स्थानिक नेते सुहास गरूड यांच्या घराबाहेर हा जादूटोण्याचा प्रकार करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी त्यांच्या घराबाहेर एका अज्ञात महिलेने लिंबू, कुंकू आणि टाचण्यात वापरून करणी करण्याचा प्रयत्न केला. यानंतर महिलेने तिथून पळ काढला. ही संपूर्ण घटना बाहेर असणाऱ्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यामुळे आता आरोपीवर कारवाईची मागणी केली जात आहे.
सुहास गरुड यांनी अलीकडेच मावळ परिसरातील मोठ्या प्रमाणातील महार वतनाच्या जागांवर सुरू असलेल्या वादग्रस्त अतिक्रमण प्रकरण उघडकीस आणले होते. यानंतर त्यांना अनेक धमक्याही देण्यात आल्या होत्या. यामुळे हा प्रकार त्या रागातून केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
तळेगाव पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावी, अशी गरूड यांनी केली आहे. तसेच जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे देखील त्यांनी म्हटलं आहे. अज्ञात महिलेचा शोध घेऊन तिला अटक करावी अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
कोण आहेत सुहास गुरूड ?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तळेगाव दाभाडे येथील सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष पदावर ते कार्यरत आहेत.





