#WinterSession2022 :नागपूर येथील हिवाळी अधिवेशन 30 डिसेंबरपर्यंत – संसदीय कार्यमंत्री पाटील

नागपूर : नागपूर येथे सुरु असलेले हिवाळी अधिवेशन येत्या 30 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. याबाबत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे बैठकीस उपस्थित होते.
विधानसभा आणि विधानपरिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक आज झाली. या वेळी हिवाळी अधिवेशनाचं कामकाज ३० डिसेंबरला संस्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे बैठकीस उपस्थित होते. (1/2) pic.twitter.com/5dC1dgyv1K
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 28, 2022
गुरुवार दि .29 डिसेंबर रोजी शासकीय कामकाज आणि शुक्रवार दि.30 डिसेंबर रोजी शासकीय कामकाज व अशासकीय कामकाज केले जाईल, असेही मंत्री पाटील यांनी सभागृहात सांगितले.





