Wimbledon 2023 : जोकोविचला हरवत ‘कार्लोस अल्काराज’ने रचला इतिहास
Updated On:

Wimbledon 2023 Final : विम्बल्डन टेनिस स्पर्धेत काल पुरुष एकेरी सामन्यात प्रथम मानांकित कार्लोस अल्काराज यानं 24 ग्रँडस्लॅम विजेतेपदं मिळविलेल्या नोवाक जोकोविच याला पराभूत करत नवा इतिहास रचला.
तब्बल 10 वर्षांनी विम्बल्डनला नवा विजेता मिळाला आहे. 20 वर्षीय अल्कराजचं हे दुसरं ग्रँड स्लॅम जेतेपद आहे. कार्लोसनच्या विजयामुळे जोकोविचची विम्बल्डन विजयाची मालिका खंडित झाली आहे.
काल लंडन इथं झालेल्या अंतिम सामन्यात अल्कराजनं जोकोविचला पाच सेट्समध्ये 1–6, 7–6, 6–1, 3–6, 6–4 असं नमवलं.
स्पेनच्या 20 वर्षीय अल्कराजनं सात वेळा विजेतेपद मिळवलेल्या जोकोविचला पराभूत केल्यामुळे तो बोरिस बेकरनंतर कमी वयात विजेतेपद मिळवलेला सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे. बोरिस बेकरनं 18 व्या वर्षी हे विजेतेपद मिळवलं होतं.

