‘माझ्यासोबत लग्न करशील का?’ चाहत्याने प्रपोज करताच जिनिलियाने दिले खास उत्तर

Genelia Deshmukh | अभिनेत्री जिनिलिया आणि रितेश देशमुख ही बॉलीवूडची लोकप्रिय जोडी आहे. दोघे सोशल मीडियाद्वारे चाहत्त्यांच्या संपर्कात राहतात. दोघांचे मजेशीर व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चर्चेत असतात. नुकतेच जिनिलियाने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत ask me सेशन घेतलं होतं. यावेळी तिने चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली. मात्र एका चाहत्याने तिला थेट लग्नाची मागणी घातली. ज्याला तिने मजेशीर पद्धतीने उत्तर दिलं.
‘मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू माझ्याशी लग्न करशील का?’, असं एका चाहत्याने जिनिलियाला विचारलं. त्यावर उत्तर देताना तिने लिहिलं, ‘मी विचार केला असता, पण मी सर्वांत सुंदर व्यक्तीशी लग्न केलं आहे.’ यावेळी एका चाहत्याने तिला रिलेशनशिपसाठी सर्वोत्तम सल्ला काय, असंही विचारलं. त्यावर जिनिलियाने तिच्याच अंदाजात ‘कोणाचेच सल्ले ऐकू नकोस, कारण तुझे अनुभव हे तुझेच असतील’, असं उत्तर दिलं. Genelia Deshmukh |
अलिकडेच जिनिलियाचा ‘सितारे जमीन पर‘ हा सिनेमा प्रदर्शित झाला. यामध्ये ती आमिर खानसोबत दिसली होती. जिनिलियाने ‘जय हो’ आणि ‘फोर्स 2’मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिका साकारल्या होत्या. ‘वेड’ या मराठी चित्रपटामध्येही तिने मुख्य भूमिका साकारली होती. आता जिनिलिया ‘ज्युनियर’ या साऊथ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या १८ जुलैला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होत आहे. Genelia Deshmukh |
हेही वाचा:





