Sanjay Jadhav : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? खासदाराने थेटचं सांगितलं म्हणाले “मी आज तुमच्यासोबत आहे, पण…”
Sanjay Jadhav : उद्धव ठाकरे यांचे विश्वासू नेते आणि खासदार संजय जाधव यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Sanjay Jadhav : गेल्या काही दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली होती. ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. ती बातमी अशी की उद्धव ठाकरे यांचे खासदार फुटणार आणि ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार. मात्र, ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याची पुष्टी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविदं सावंत यांनी केली होती.
याअगोदरही अनेकदा ठाकरेंचे खासदार फुटून शिंदेच्या शिवेसेनेत जाणार असल्याची चर्चा सतत होत असते. अशातच आता उद्धव ठाकरेंच्या एका खासदाराने केलेल्या विधानामुळे मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
“मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही,” असे वक्तव खासदार संजय जाधव यांनी परभणी येथील आयोजित एका कार्यक्रमात केले आहे. यामुळे चर्चांना उधाण आले असून, या विधानातून त्यांनी आगामी राजकीय वाटचालीस एक प्रकारे वाट मोकळी केली असल्याचे बोलले जात आहे.यामुळे ते एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार का, याबाबतच्या चर्चांना अधिक जोर मिळाला आहे.
नेमकं काय म्हणाले संजय जाधव? (Sanjay Jadhav)
“ज्या पक्षाने मला घडवले, त्या पक्षाचा मी आजही आदर करतो आणि पुढेही करत राहीन. मला संधी देणाऱ्यांशी प्रतारणा करण्याची माझी मानसिकता नाही. मात्र बदलत्या परिस्थितीत उद्या काय होईल, हे सांगता येत नाही. राजकारण आता समाजकारणापेक्षा आर्थिक निकषांवर चालू आहे. मन चंगा तो कटोरी में गंगा, नियत में खतरा तो झोली में पथरा असे म्हणत आम्ही अनेक चढ-उतार पाहिले आहेत. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ,” असे सूचक विधान केले आहे. (Sanjay Jadhav)
ठाकरेंना मोठा धक्का? Sanjay Jadhav
परभणीतील एका खाजगी रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना संजय जाधव यांनी आपली आगामी राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे संजय जाधव यांच्या या विधानामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. जर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला, तर मराठवाड्यात ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो.
हेही वाचा : HSC Result : बारावीचा निकाल जाहीर! यंदाही मुली ठरल्या अव्वल; राज्याचा ८९.७९ टक्के निकाल





