दिलासा मिळणार की हिरमोड होणार? लाडकी बहीण योजनेच्या E-KYCसाठी उरले अवघे काही तास…

Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेत सर्व लाभार्थी महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. यासाठी १८ नोव्हेंबर म्हणजे उद्यापर्यंत मुदत देण्यात आली आहे. आता केवायसी करण्यासाठी लाडक्या बहिणींकडे अवघे काही तास शिल्लक आहेत.
सध्या राज्यात २.३५ कोटी महिला लाभ घेत आहेत. यातील १.३ कोटी महिलांनी केवायसी केली नसल्याचे समोर आले आहेत. दुसरीकडे लाडकी बहीण योजनेतील केवायसीाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली जात आहे. मात्र अद्याप सरकारकडून यावर कोणातही निर्णय झालेला नाही.
ही प्रक्रिया पूर्ण करताना लाखो महिलांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागल्याने अनेक महिलांनी अद्यापही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे शासनाकडून ही मुदत वाढवून दिली जाणार का, याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे.
मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केवायसीसाठी मुदतवाढ दिली नाही तर कोट्यवधी महिलांचे लाभ बंद होऊ शकतात. त्यामुळे सरकार विरोधात महिलांचा रोष वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. Ladki Bahin Yojana |
केवायसी प्रोसेसमध्ये बदल
लाडकी बहीण योजनेत केवायसीसाठी महिलांच्या पती किंवा वडिलांचे आधार कार्ड लागते. मात्र ज्यांचे पती आणि वडील हयात नाही अशा महिलांनी केवायसी कशी करणार? याबाबत आता वेबसाइटमध्ये बदल केले जाणार आहेत. आता या महिलांसाठी वेबसाइटवर नवीन सेक्शन तयार केले जाणार असून त्याद्वारे महिलांना केवायसी पूर्ण करता येणार आहे. Ladki Bahin Yojana |
हेही वाचा :





