‘करण अर्जुन’ चित्रपटाचा सीक्वल येणार? सलमान-शाहरुखच्या जागी दिसणार ‘हे’ कलाकार

Karan Arjun 2 | अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान यांचा ‘करण अर्जुन’ हा चित्रपट बॉलीवूडमधील सुपरहिट चित्रपटांच्या यादीत गणला जातो. 90 च्या दशकात या चित्रपटाने अक्षरश: चाहत्यांना वेड लावले होते.
यात या दोन्ही अभिनेत्यांनी साकारलेल्या सख्ख्या भावांच्या भूमिकेला प्रचंड प्रेम मिळाले. यानंतर आता ‘करण अर्जुन’चा सीक्वल येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. परंतु यात सलमान-शाहरुखची जोडी दिसणार नाही.
एका मुलाखती दरम्यान दिग्दर्शक राकेश रोशन यांनी याबाबत खुलासा केला आहे. ‘करण-अर्जुन 2′ मध्ये मला रणबीर कपूर आणि हृतिकला पहायला आवडेल. कारण शाहरुख-सलमाननंतर जर कोणी या दोन्ही भूमिका साकारू शकत असेल, तर ते हेच दोघे आहेत,’ असे राकेश रोशन म्हणाले. Karan Arjun 2 |
यानंतर राकेश रोशन यांना तुम्ही ‘करण-अर्जुन 2’ बनवाल का? असेही विचारण्यात आले. त्यावर राकेश रोशन म्हणाले की, जर चांगली पटकथा सापडली तर नक्कीच विचार करेल. राकेश रोशन यांनी सिद्धार्थ कन्ननच्या पॉडकास्टमध्ये हेसांगितले आहे. Karan Arjun 2 |
‘करण अर्जुन’ हा चित्रपट राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केला होता. तर या चित्रपटात हृतिक रोशननं असिस्टंट म्हणून काम केलं होतं. शाहरुख खाननं अर्जुनची भूमिका साकारली होती आणि सलमान खाननं करणची भूमिका साकारली होती. Karan Arjun 2 |
तर काजोल, ममता कुलकर्णी, राखी गुलजार, जॉनी लिव्हर, अमरीश पुरी, रणजीत, अशोक सराफ आणि आशिफ शेख हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये होते. 13 जानेवारी 1995 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला होता.
हेही वाचा:





